Tarun Bharat

प. बंगाल : सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला; TMC नेत्यावर आरोप

ऑनलाईन टीम / कोलकाता : 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज पाच जिल्ह्यांतील ३० जागांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रांवर हिंसक संघर्षही झाला आहे. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कंठीतील सबजपूर येथे हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी सौमेंदू अधिकारी गाडीत  नव्हते. त्यामुळे ते बचावले. मात्र, या हल्ल्यात सौमेंदू यांचा चालक जखमी झाला आहे. गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सौमेंदू याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. 

दरम्यान, सौमेंदू यांच्या कारवरील हल्ला आणि चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सौमेंदू यांनी तृणमूल काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राम गोविंद दास यांना जबाबदार धरले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

Related Stories

त्रिपुरा राज्यपालपदी आर्य शपथबद्ध

Patil_p

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या कन्येला अमेरिकेत खलिस्तानींची धमकी

Amit Kulkarni

‘डब्ल्यूएफआय’ची बैठक चार आठवडे लांबणीवर

Patil_p

माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचे निधन

Patil_p

काही औषधांच्या निर्यातीला मंजुरी

Patil_p

समिती स्थापण्याची शेतकऱयांची तयारी

Patil_p