Tarun Bharat

फख्र झमान न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

इस्लामाबाद : पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फख्र झमान याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱयाला मुकावे लागणार आहे. पाकचा संघ सोमवारी न्यूझीलंडला रवाना झाला असून या दौऱयामध्ये दोन कसोटी, तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.

न्यूझीलंड दौऱयासाठी पाक संघात निवड झालेल्या फख्र झमानला शनिवारपासून ताप जाणवू लागला. शनिवारी पाक संघाचे डॉक्टर सोहेल सलीम यांनी फख्र झमानला कोरोना चांचणी करण्यास सांगितले. या चांचणीत तो निगेटिव्ह आढळला. तरी पण त्याला या दौऱयासाठी संघातून घेवून न जाण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. कोरोना महामारी समस्येमुळे संघातील इतर खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने 30 वर्षीय फख्र झमानला या दौऱयासाठी वगळण्यात आले. फख्र झमानने 47 वनडे सामन्यात तसेच 40 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 डिसेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर होणार आहे.

Related Stories

महिला हॉकी संघातील सदस्य ‘पॉझिटिव्ह’

Amit Kulkarni

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

आर. प्रज्ञानंद अंतिम फेरीत

Patil_p

जुलैअखेर सर्व टेबलटेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल मार्श अडकला विवाहबंधनात

Patil_p

ओसाका, स्विटोलिना, ओस्टापेन्को, कार्लोस यांचे आव्हान समाप्त

Patil_p
error: Content is protected !!