Tarun Bharat

फटाका कारखान्यात उत्तरप्रदेशमध्ये स्फोट

सहारनपूर / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील फटाक्मयांच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर परिसराला भीषण आग लागली. दारुगोळय़ाचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणली. या भीषण दुर्घटनेत कारखाना मालक राहुलसह अन्य चौघांचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज पाच किमी दूरपर्यंत पोहोचल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. तसेच स्फोटांमुळे मृतदेहांचे काही भाग 500 मीटर अंतरावर विखुरलेले आढळले. 

सरसावा ते सुराणा दरम्यान अंबाला रोडवर दुर्घटनाग्रस्त फटाका कारखाना होता. शेतभागात हा कारखाना उभारण्यात आला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे सुमारे 10 कर्मचारी येथे काम करत होते. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक कारखान्याच्या एका कोपऱयात आग लागली. ही आग विझवण्यापूर्वी गनपावडरपर्यंत पोहोचल्यामुळे मजुरांना धावपळ करण्याची संधीही मिळाली नाही. आगीचे लोट तीन किमी अंतरावरून दिसत होते.

Related Stories

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या 12 प्रचार सभा

datta jadhav

जम्मू-काश्मीरमध्ये ‘बाहेरच्यां’नाही मतदानाचा अधिकार

Amit Kulkarni

अमरिंदर सिंग यांच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

Patil_p

कोरोनाविरोधातील लढाईत एअर इंडियाची कामगिरी गौरवास्पद

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 500 नवे कोरोना रुग्ण; 30 मृत्यू

Tousif Mujawar

पश्चिम बंगालमध्ये अल् कायदा संशयितांना अटक

Amit Kulkarni