Tarun Bharat

फटाका कारखान्यात स्फोट, 7 ठार

तामिळनाडूतील घटना, तीन गंभीर जखमी

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूमधील कुडलोर जिल्हय़ात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 7 जण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले असले तरी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढू शकते.

कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम. अभिनव यांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईपासून 190 किलोमीटरवरील कुडलोर जिल्हय़ात ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटामध्ये फटाका कारखान्याच्या मालकासह 7 जण ठार झाले आहेत. तथापि गंभीर जखमींची संख्या अधिक असून यातील तीनजण जखमी आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याचीही भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी पोलिसांसह अग्नीशमन दलाचे जवानही दाखल झाले असून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. फटाके तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त रसायने वापरली आहेत काय यांचाही शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

दिल्ली हिंसा : आरोपपत्रात येचुरींचे नाव

Patil_p

प्रख्यात पत्रकार कमाल खान यांचे निधन

Patil_p

सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी

Patil_p

पाकिस्तानचा ‘नापाक’ कट व्यर्थ

Patil_p

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

Abhijeet Khandekar

आसामची महिला केरळमध्ये उमेदवार

Omkar B