Tarun Bharat

फडणवीचांची अवस्था म्हणजे “कोणी खूर्ची देता का खूर्ची…”

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली होती. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलं.

राऊत यांनी ”गोव्याला रंगभूमीचा खूप मोठा वारसा आहे. नटसम्राटाचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातले सर्व नटसम्राट हे गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. फडणवीस गोव्याच्या जनतेचा, नाट्यकर्मींचा अपमान करतात. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे, कोणी मला घर देता का घर घर. अगदी तशीच फडणवीसांची अवस्था आहे. कोणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था आहे. नटसम्राट म्हटल्यानं मला वाईट वाटलं नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. मला आनंद आहे, की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण, आम्ही शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही”, असं जोरदार उत्तरही राऊतांनी दिलं.

Related Stories

“गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि …” : मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे वक्तव्य

Archana Banage

पुढील वर्षीपासून ‘तेजस-2’ची स्वनिर्मिती

Patil_p

देशात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 378 वर

prashant_c

`युनिफाईड बायलॉज’चे घोडे अडले कुठे?’

Archana Banage

इंधन दरवाढीचा भडका सुरूच

Tousif Mujawar

‘बाप’ काढल्याच्या वादग्रस्त ट्विटनंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून त्या शिवसैनिकाची हकालपट्टी

Archana Banage