Tarun Bharat

फडणवीसांनी सदाभाऊंना भरवला विजयाचा पेढा

सांगली / प्रतिनिधी

सदाभाऊ तुम्हाला साखर नाही ना ? अशी विचारणा करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना रविवारी मुंबईत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयाचा पेढा भरवला.

रणनीतीचा अवलंब करून महाविकास आघाडीला पराभुत करुन भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेद्वार समाधान अवताडे यांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ​सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर “सदाभाऊ इकडे या, तुमचा देखील या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे. तुम्हाला शुगर नाही ना ? मग अख्खाच पेढा घ्या… असे म्हणत फडणवीस यांनी खोत यांना पेढा भरवुन आनंद व्यक्त केला. निवडणुकीमध्ये काम केलेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

यावेळी माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. बाळा बेगडे, खा. रणजितदादा निंबाळकर, आ. प्रशांत परीचारक, आ. जयकुमार गोरे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे, श्रीकांत भारतीय, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. काही कारणांनी आमदार गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते मात्र त्यांचाही गौरवपूर्ण उल्लेख या बैठकीत करण्यात आला.

Related Stories

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

साखर उद्योगावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

prashant_c

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान

Rohit Salunke

सोलापूर : बळीराजा अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत तर तहसीलदार म्हणतात आदेश नाहीत

Archana Banage

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटीव्ह

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी 237 रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage