Tarun Bharat

फर्मागुडी किल्ल्यावर शिवराज्यभिषेक दिन साजरा

प्रतिनिधी / फोंडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 348 व्या शिवराज्यभिषेक दिनानिमित्त फर्मागुडी येथील किल्यावरील अश्वारूढ पुतळय़ाला कला व संस्कृती मंत्री गोवेंद गावडे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले.

  यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गौरीश कुर्टीकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक,  एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, वेलिंग प्रियोळ कुकळय़ेचे सरपंच मंगेश गावडे, लक्ष्मीकांत खेडेकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सदर  सोहळा मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा, स्वराज्यासाठी स्वाभीमानाने जगणे अंत्यत आवश्यक आहे. महाराजांचे विचारातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी असे ते म्हणाले. शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

मोबाईल दुकानातील चोरीचा 24 तासात पर्दाफाश

Patil_p

आजपासून शनिवारपर्यंत दररोज पावसाची शक्यता

Amit Kulkarni

जत्रोत्सवांवर कोरोनाचे नियंत्रण

Patil_p

सत्ता असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाहीय ः कामत

Patil_p

मुख्यमंत्र्यांची घाई गोमंतकीयविरोधी धोरणांचे सूचक

Omkar B

पडझड झालेल्या इमारती खाली करण्याची नोटीस

Patil_p