Tarun Bharat

फलंदाज प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड पुन्हा रिंगणात

वृत्त संस्था/ अबु धाबी

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोडने पुन्हा या पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज पाठविला आहे. विक्रम राठोडने शास्त्राrसमवेत भारतीय खेळाडूंना फलंदाजी संदर्भात मार्गदर्शन केले आहे. रवि शास्त्राrचा बीसीसीआय बरोबरचा करार आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपणार आहे. माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय संघाला नवा प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभणार आहे. 2019 साली राठोडची फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

तत्पूर्वी संजय बांगर भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक होता. राठोडचा बीसीसीआय बरोबरचा करार टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपणार आहे. दरम्यान राठोडने पुन्हा या पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे. राठोडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गेल्यावर्षीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. 52 वर्षीय राठोडने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत सहा कसोटी आणि सात वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Related Stories

टेलर, कायतानो यांची अर्धशतके

Patil_p

निसांका, थिरिमने यांची दमदार अर्धशतके

Amit Kulkarni

रिओ टेनिस स्पर्धेत नुरी अजिंक्य

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीचा आढावा

Patil_p

सलग पाचव्या विजयासह चेन्नई ठरले ‘सुपरकिंग्स’!

Patil_p

आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पाच महिला मल्लांची निवड

Patil_p