ऑनलाईन टीम / फलटण :
फलटणच्या विकासाचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांचे 27 ऑगस्ट रोजी लेह- येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फलटण शहरावर शोककळा पसरली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे भोईटे फलटण नगरपालिकेवर गेली 35 वर्ष निवडून आले. विकासाच्या कल्पकतेने त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न कायम ठेवला होता. कोरोना काळात सजाई गार्डन येथे त्यांनी सुरु केलेले कोरोना केअर सेंटर यातून त्यांचा दानशूरपणा फलटणकरांनी सातत्याने अनुभवला होता. त्यांच्या निधनाने फलटणच्या राजकीय, सामाजिक, व्यवसाय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.