Tarun Bharat

फलटणमध्ये 9 लाख रूपये किमंतीचे गोमांस हस्तगत

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहरातील कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन  जनावराचे गोमांस दोन चारचाकी वाहने ताब्यात घेतली असून सात जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       या बाबत सविस्तर माहिती अशी की  , दिनांक 03 मे रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर मंगळवार पेठ फलटण येथे इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी विनापरवाना, बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली होती,या मध्ये 1500 किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेले जिवंत जनावरे व गोमांस वाहतूक करण्यासाठी लागणाया वाहनासह त्या मध्ये एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती 800, एक मोटर सायकल, असा  एकूण  9,10,000/- रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

  सदर गुह्याचा तपास  पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम  करीत आहे.

Related Stories

‘त्या’ दोन मेडिकल स्टोअर विरोधात तक्रार दाखल

Archana Banage

राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : जिल्हा परिषद खर्चाचे अधिकार सीईओंकडे

Archana Banage

कराडला सलग दुसऱया दिवशीही झोडपले

Patil_p

सातारा : कोकणातला जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोत

Archana Banage

MPSC च्या पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

datta jadhav

सातारा : वाईमध्ये मुलींची शाळा जमीनदोस्त

datta jadhav