Tarun Bharat

फलटण तहसील कार्यालयही नाही सुरक्षित

Advertisements

महसूल विभागातील दोन लाखांच्या साहित्याची चोरी

प्रतिनिधी/ फलटण

येथील सिटी बिल्डिंगमध्ये असलेल्या तहसीलदार कार्यालयातील महसूल विभाग चक्क चावीने उघडून चोरटय़ांनी कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, किबोर्ड, माऊस, केबल, राउटर असा सुमारे 2 लाख 700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, या घटनेने महसूल विभागाच्या अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला असून आत्तापर्यंत या कार्यालयाच्या परिसरातून वाळू/माती मुरूम याची चोरी करणाऱया वाहनांची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र आता चक्क मालमत्तेची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या चोरीच्या घटनेने फलटण शहरासह जिह्यात एकच खळबळ उडाली असून बेजबाबदारपणे ती चावी तिथे ठेवली का? की या कार्यालयातच कोण या चोरीत सहभागी आहे? तर ही चावी ठेवणाऱया कर्मचाऱयांवरती कोणती कारवाई होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून महसूल विभागात झालेल्या या घटनेने या असलेल्या संगणकात असलेली माहिती पुन्हा मिळणे कठीण असून या घटनेची माहिती मिळताच स्वतः तहसीलदार समीर यादव यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांची भेट घेतली. तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किंद्रे यांनी सातारा येथून श्वान पथक मागविले असून या चोरीची माहिती व तेथील ठसे घेण्याचे काम सुरू होते.           

फलटण शहर पोलीस स्टेशनमधून व फिर्यादी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार दि. 29 जानेवारी रात्री 10.15 ते शनिवार दि. 30 जानेवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान तहसीलदार कार्यालय फलटण येथील महसूल शाखेतून कोणीतरी अज्ञात चोरटय़ाने स्वतःच्या फायद्याकरता मुद्दाम लबाडीने व्हरांडय़ाच्या नोटीस बोर्डवर ठेवलेली महसूल शाखेच्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश करून पुढील मुद्देमाल चोरून नेला आहे.

यामध्ये माऊस, मॉनिटर, केबल, कीबोर्ड, टोनर, प्रिंटर, लॅपटॉप व चार्जर केबल, राउटर, स्विच बोर्ड असा एकूण 2 लाख 700 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला आहे.

याबाबतची फिर्याद नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम 45/380 भा. द. वि. कलम 457,380 नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

Related Stories

कचरा गाडीचे टेंडर नेमके कोणाला जाणार ?

Patil_p

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा

Patil_p

गॅस गळतीमुळे आग

Patil_p

गणेशोत्सव शांततेत साजरा करा

Patil_p

बाऊन्सर्सचा निर्णय सर्वस्वी जिल्हाधिकाऱयांचा

Patil_p

कराड पालिकेचा नारा ‘वेस्ट टू वेल्थ’

Patil_p
error: Content is protected !!