Tarun Bharat

फलटण विभागामध्ये महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमाला सुरवात

प्रतिनिधी/ सातारा

सातारा, दि. 26 मे 2020 :थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा एक गाव ा एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला फलटण विभागामध्ये सुरवात झाली आहे. यामध्ये भादे (ता. खंडाळा) व गिरवी (ता. फलटण) या दोन गावांतील वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. 

पावसाळा व त्यानंतरच्या कालावधीत सुरळीत वीजपुरवठय़ासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून एक गाव – एक दिवस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी टाळण्यासाठी या उपक्रमातून सध्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. तसेच सर्व कार्यालय, उपकेंद्र व परिसरांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

फलटण विभाग अंतर्गत भादे (ता. खंडाळा) व गिरवी (ता. फलटण) या दोन गावांतील वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती नुकतीच पूर्ण झाली. यामध्ये सुमारे 2800 मीटर वीजवाहिन्यांना अडथळे ठरणाया झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. तसेच रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठय़ाला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामे करण्यात आली. 

फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मंदार वाग्यानी यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता श्री. सचिन काळे (लोणंद), श्री. भरत खिलारे (फलटण ग्रामीण), कनिष्ठ अभियंता श्री. शरद ओंकार, श्री. भरत भोसले यांच्यासह सुमारे 25 कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. 

Related Stories

पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत धावणार

Archana Banage

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना रोखू नका – खा. संभाजीराजे

Archana Banage

पळून गेलेल्या ‘त्या’ सहाय्यक पोलीस निरीक्षकास अखेर अटक

Archana Banage

‘सीआरपीएफ’ मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत ; प्रवेशद्वारावर दगदफेक

Archana Banage

पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 46.19 लाखांचा निधी

datta jadhav

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांविरोधात क्लोजर रिपोर्ट

datta jadhav