Tarun Bharat

फळे व भाजीपाला वर्ष-2021

अन्न व कृषी संघटनेने 2021 हे वर्ष आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष म्हणून जगभर साजरे केले जावे, असे सूचित केले. गेल्या काही वर्षामध्ये फळे व भाजीपाल्याचे सेवन वाढत आहे. आरोग्यदायी व शाश्वत फलोत्पादन हे या वर्षाचे ब्रीद असून नाविन्य व तंत्रज्ञान निर्मितीच्या माध्यमातून फळे व भाजीपाल्यांचा अपव्यय व नासाडी कमी करणे हा उद्देश आहे. फळे व भाजीपाला हे अन्नघटक आहेत. त्यांच्या नियमित सेवनाने मानवी आरोग्याचे प्रश्न सुटतात. प्रतिकार शक्ती वाढते. देह, त्वचा, शरीरप्रक्रिया चांगली राहते. त्याचे उत्पादन, विक्री आणि शाश्वत उपभोग सुधारण्यासाठी योग्य प्रक्रिया, वाहतूक, उप-फल यामध्ये सुधारणा करण्याचे हे वर्ष आहे. त्याला अद्याप योग्य प्रतिसाद मिळत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शासकीय धोरणे. ‘फार्म टू फोर्क’ या सर्व टप्प्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी आहे. विशेषतः नाविन्य व तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देण्यासाठी आर अँड डी सुधारले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते पाठबळ शासनाने दिले पाहिजे.

कुपोषण व प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी फळे आणि पालेभाज्यांची खूप गरज असते. पचनसंस्था सुधारण्यासाठीदेखील त्यांची आवश्यकता असते. सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा किमतीला ते उपलब्ध झाले पाहिजे. शेतकरी ते उपभोक्ते यामध्ये असंख्य दलाल, मध्यस्थ असतात. उपभोक्त्यांच्या रुपयातील शेतकऱयांचा हिस्सा नगण्य आहे. ही व्यावहारिक दृष्टी प्रथमतः सुधारली पाहिजे. यामुळे कृषी पणन व्यवस्था दुबळी होत आहे. एक डाळिंब केवळ एक रु.ला शेतकऱयाकडून विकत घेतले जाते अन् त्याची विक्री दहा रु.ला होत असेल तर ते उत्पादकाला परवडणारे नाही. आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्षाच्या निमित्ताने ही साखळी तोडली गेली पाहिजे. बांधावरचा बाजार हे जरी सुलभ असले तरी ग्राहक दररोज बांधावर येऊन शेतमाल खरेदी करेल, अशी स्थिती नाही. मध्यस्थांनी योग्य दलाली घ्यावी. फळे व भाजीपाल्यांच्या नासाडीचा फटका मध्यस्थांनाही बसतो. म्हणूनच वाहतूक व व्यापार सुलभ होण्यासाठी शेतमालाच्या योग्य वाणांची निवड केली जाते. उदा. टोमॅटो. मूळ देशी टोमॅटो बाजारात मिळत नाही. कारण त्याची वाहतूक व हाताळणी खूप नाजूक असते. टणक कवचाचा टोमॅटो वाहतूक-व्यापाराला सुलभ असतो. उत्पादन ते उपभोग यामध्ये बरेच नाविन्य निर्माण होऊ शकते. त्यासाठी यंत्र अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची जोड निर्माण करणारी मेकॉनॉट्रिनिक्सचे विज्ञान विकसित झाले पाहिजे. विविध सेन्सॉरच्या साहाय्याने फळांची गुणवत्ता मोजता येते अन् पाहता येते. दुधाची गुणवत्तादेखील तपासता येते. विशेषतः भविष्यात आजारी पडणाऱया दुधाळ जनावरांच्या दुधावरून भाकित करता येते. यासाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे.

सेंद्रिय पद्धतीनेच फळे व भाजीपाल्यांची निर्मिती झाली पाहिजे. कारण त्याचा थेट उपभोग घेतला जातो. ग्राहकांच्यादृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सेन्सॉरच्या मदतीने गुणवत्ता हे पूर्ण शेतमालाची खरेदी करण्याचे तंत्र विकसित केले पाहिजे. फियॉटो-सॅनिटेशन तंत्राने फळाची आणि पालेभाज्यांची गुणवत्ता पाहण्याचे तंत्र अस्तित्वात असूनसुद्धा त्याचा वापर केला जात नाही. फळे आणि भाजीपाल्याची हाताळणी अत्यंत गलिच्छ पद्धतीची असते. तसेच त्यांचे उत्पादनदेखील गैरपद्धतीने केले जाते. अर्थात सर्वच शेतकरी असे करतात असे नाही. पण गटारीच्या पाण्याचा वापर, घाण पाण्याने शेतमालाची धुलाई करणे, फळांना आणि भाजीपाल्याला चकाकी येण्यासाठी शाम्पूची फवारणी करणे, युरिया अथवा विपुलचा फवारा मारून भाज्या ताज्या केल्या जातात. केळी पक्व होण्यासाठी फॉस्फरसचा वापर करणे अथवा त्याच्या भट्टीमध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया करणे यासारख्या बाबी वर्ज्य आहेत. पण त्याचा सर्रास वापर केला जातो. सफरचंदाच्या पेटीमध्ये अनेक प्रकारचे फंगस तयार होतात. त्यावर सुरक्षा कवच निर्माण करणे शक्मय आहे. दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ज्या भाज्यांचा थेट उपभोग घेतला जातो, त्यावर अशा प्रक्रियेची गरज असते. पालेभाज्यांची निर्मिती टे पद्धतीने करून टे विक्रीसाठी बाजारात आणता येतात. विशेषतः कोथिंबिर, पुदिना, मेथी अशा अनेक भाज्यांची निर्मिती टे किंवा कागदी कपामध्ये करता येते. शहरी शेती पद्धतीने परसबागेमध्ये असे प्रयोग करता येतात. प्रयोग परिवाराने याची प्रात्यक्षिके केलेली आहेत. गच्चीवरची शेती सुलभ आहे. यामुळे घरातील मुलांना निर्मितीचा आनंद मिळतो. महिलांचे आरोग्य सुधारते. टीव्हीवरच्या मालिकेप्रमाणे स्वयंपाकाचे वेळापत्रक तयार करण्याची गरज नाही. विशेषतः स्त्रियांचा स्थूलपणा, रक्तदाब, मधुमेह यावर काही अंशी इलाज होऊ शकतो. अशाच पद्धतीची उर्ध्व शेती (हायड्रोपोनिक) करता येते. त्यामुळे आपल्याला हवी ती भाजी सेंद्रिय पद्धतीने पिकविता येते. स्ट्रॉबेरीची लागवड उर्ध्व पद्धतीने केली जाते. ते आरोग्यदायी आणि गुणवत्तेने श्रे÷ असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील मोकळे भूखंड भाडेपट्टीने देता येतील. व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी गट, एनजीओ यांना हे भूखंड देता येतील. शिवाय ज्या भूखंडामध्ये अशी लागवड शक्मय नाही, तेथील जागा शेतमालाच्या विक्रीसाठी वापरण्याची व्यवस्था करता येते. फार्मर्स मार्केट ही संकल्पना अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक मॉल, डी-मार्टच्या शेजारी फार्मर्स मार्केट्स असतातच.

स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आरोग्यदायी जीवन जगणे सध्या आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी मल्टिव्हिटॅमिनच्या गोळय़ांच्या सेवनाची गरज नाही. झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम व आयोडिन या चार घटकांमुळेच प्रतिकारशक्ती निर्माण होते. या घटकांच्या भाज्या, फळे, शेतमाल निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणूनच फार्मास्युटिकल फार्मिंग लोकप्रिय होत आहे. मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन व वनौषधींचे उत्पादन उच्च मूल्यवर्धित पिके आहेत. त्यांच्या उत्पादनामुळे शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. यासाठी उत्पादक, उपभोक्ते आणि शासकीय यंत्रणेची मानसिकता बदलली पाहिजे. नव्या दमाची धोरणे आणि कृति-कार्यक्रम आखावे लागतील. मुळात शेतकरी बदलला पाहिजे आणि ग्राहकांमध्ये शेतकऱयांच्या कष्टाला दाम देण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे. शेतकऱयांप्रति प्रेम, सहिष्णुता, आदर आणि प्रति÷ा देण्याची समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. दुर्दैवाने यासंबंधीची कोणतीही मानसिकता शासनकर्त्यांमध्ये नाही. सत्तेचा आणि अधिकाराचा वापर योग्य व सकारात्मक केला पाहिजे. आपल्यामुळे जर चांगले होऊ शकते तर ते केलेच पाहिजे, ही भूमिका घेऊन कार्य केल्यास भारताची तुलना इतर देशांशी करून कोणाच्याही आदर्शांच्या पालनाची गरज भासणार नाही. आपणच आदर्श निर्माण करू शकतो.

डॉ. वसंतराव जुगळे- 9422040684

Related Stories

गोव्यातील घर कचऱयाची समस्या घरीच सोडवुया

Patil_p

देशांतर्गत नौकावाहतूक विधेयक संमत

Patil_p

चक्रतीर्थ यांची पाठयपुस्तक समिती रद्द करा : निषेध मोर्चा निदर्शने

Rohit Salunke

मध्य प्रदेशातील 462 गावांमधील 951 जणांना कोरोना, 32 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

नरंदेत कोरोनाचे दोन रुग्ण

Archana Banage

ब्रेनड्रेन रोखण्याचे आव्हान

Patil_p