Tarun Bharat

फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला अन्…

गौरी आवळे / सातारा :

सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर वाहन विक्रीचा एक गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा मोठय़ा टोळीचा पर्दाफाश करणार असा अंदाज ही शहर पोलीसांकडून बांधण्यात आलेला नव्हता. परस्पर देवाण-घेवाण यातून हा गुन्हा दाखल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत तपासाला सुरूवात झाली. तपासाची चक्रे गतीमान होत असताना पोलिसांच्या हाती लागलेले धागे-दोरे हे मोठय़ा फसवणूकीचा गुन्हा उघड करत गेले. बघता बघता एका गुन्ह्यामुळे कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले. या गुन्ह्याचे स्वरूप इतके व्यापक होते की, इतरही राज्यात जावून वाहने परत आणण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

निरा. ता. पुरंदर जि. पुणे येथे राहत असलेला उन्मेश उल्हास शिर्के व साथीदार अब्दुलकदीर मोहम्मद अली सय्यद हे दोघेही एजंटची कामे करत असल्याने यांची बऱयाच लोकांशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत फायनान्स कंपनीकडून ज्या वाहनमालकांनी वाहने खरेदी केली आणि पैशाअभावी त्यांचे हप्ते थकले आहेत. यांची माहिती काढण्यास सुरूवात केली. ही माहिती हाती येताच या वाहनमालकांशी संपर्क साधून त्यांना भेटायचे. त्यांना विश्वासात घेऊन कायदेशीररित्या हे वाहन खरेदी व चालवण्यास घेत असल्याचे भासवत कागदपत्रे तयार करायची आणि दोन ते तीन लाख रूपये देऊन इतर हप्ते भरतो असे सांगून वाहन घेवून पसार होत होते. सुरूवातील वाहनमालकांना संशय येऊ नये म्हणून 8 ते 10 हप्ते भरायचे. नंतरचे हप्ते न भरल्याने संबंधित वाहनमालकांच्या मागे वसुलीचा तगादा लागायचा. यामुळे वाहनमालक पुन्हा संकटात सापडायचे. खरेदी केलेला ट्रक ही जवळ नाही आणि हे उन्मेश व अब्दुलकदीर हे फोन ही उचलत नसल्याने अनेकांवर मानसिक दडपणच आले होते. आज फोन उचलतील, उद्या उचलतील म्हणत या वाहनमालकांनी फोनवर फोन केले. तरी ही एकाही फोनचे प्रतिउत्तर आले नाही.

मग नक्कीच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पहिला गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्हा दाखल झाला आता तपासाची चक्रे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी वेगाने फिरवण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम यांच्यासह पथकाला दिल्या.

त्यांच्याकडे एका गुन्ह्याची चौकशी करताना इतर ही गुन्हे उघडकीस येऊ लागले. फक्त एका वाहनमालकांची अशी फसवणूक केली नसून गुजरात, तसेच पुणे, नगर, बीड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात 22 ट्रक, 8 छोटा हत्ती, एक बोलेरो, एक स्विफ्ट अशा गाडय़ा होत्या. या गुजरामधील वाहनमालकांनी आरोपींना 90 लाख रूपये दिले होते. पोलिसांना गुजरातमधून 7 गाडय़ा परत आणण्यात यश आले. अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचे गांभीर्य वाढत गेले. या आरोपींविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल होताच, फसवणूक झालेल्या अनेक वाहनमालकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल, वाकड पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल, रत्नागिरीला 2, पनवेल 1, पुरदंरला 1, नाशिक 2, शिलोड 2 असे गुन्हे दाखल केले.

मोबाईलचे लोकेशन ठरले दिशादर्शक

आरोपी उन्मेश व अब्दुलकदीर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळली तर ते फरार होतील. म्हणून पोलिसांनी कोणताही सुगावा न लागू देता त्यांच्या मोबाईल लोकेशच्या आधारे ठिकाणाचा शोध घेतला. उन्मेश हा उरळीकाचंन पुणे, तर अब्दुलकदीर याला साकीनाका मुंबई येथे असल्याचे कळताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत सशर्त लॉकडाऊन : जिल्हाधिकारी

Archana Banage

शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये : शेखर सिंह

Archana Banage

खराडेवाडी हद्दीत मोटारसायकल, मोबाईल हिसकावून चोरटे फरार

datta jadhav

महाबळेश्वरातील मुकदेव गावाजवळ टेम्पोला अपघात

Kalyani Amanagi

साताऱ्यात सध्याच्या निर्बंधात 1 जून पर्यंत वाढ

Archana Banage

दिव्यनगरीत अज्ञातांनी दुचाकी पेटवून दिल्या

Amit Kulkarni