Tarun Bharat

फसव्या निर्यातदारांशी संबंधित 56 कस्टम ब्रोकरचे परवाने निलंबित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

फसव्या निर्यातदारांशी संबंधित 56 कस्टम ब्रोकरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 56 पैकी 37 ब्रोकर दिल्लीचे आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) यासंदर्भात माहिती दिली.

विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालयाने फसव्या निर्यातीच्या लिंकमध्ये 62 कस्टम ब्रोकरची तपासणी केली. त्यामधील 56 ब्रोकर दोषी आढळल्याने सीबीआयसीने त्यांचे परवाने निलंबित केले. 

या दलालांनी 15,290 हून अधिक निर्यात कन्सईनमेंट हाताळल्याचे तपासात आढळून आले. हे कन्सईनमेंट1431अज्ञात निर्यातदारांचे होते, जे प्रयत्न करूनही सापडू शकले नाहीत. एका प्रकरणात कस्टम ब्रोकरने 121.70 कोटी रुपयांच्या आयजीएसटी परताव्याचा दावा करणाऱ्या 99 बेपत्ता निर्यातदारांची निर्यात हाताळली होती.

या सर्व कस्टम दलालांच्या हालचाली संशयास्पद होत्या आणि या प्रकरणांमध्ये 226 कोटी रुपयांचा आयजीएसटी परतावा थांबवण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे, असे सीबीआयसीने सांगितले. या 56 दलालांचे परवाने निलंबित करण्याबरोबरच तपास सुरू असल्याचे सीबीआयसीने सांगितले.

Related Stories

आफ्रिकन चित्ते आज ‘कुनो’मध्ये सोडणार

Patil_p

नितीश कुमार, तेजस्वींना भेटले केसीआर

Patil_p

इज्जत वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने माझ्यावरची बंदी उठवली

datta jadhav

महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपासून धावणार ‘या’ पाच एक्सप्रेस गाड्या

Tousif Mujawar

गुजरातमधील मतांमुळे आप बनला राष्ट्रिय पक्ष; सिसोदियांचे ट्विट

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,066 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 163 मृत्यू

Tousif Mujawar