Tarun Bharat

फातोडर्य़ात आज एटीकेएमबीची लढत केरळ ब्लास्टर्सशी

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज रविवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एटीके मोहन बागान आणि केरळ ब्लास्टर्स संघात सामना होणार आहे. एटीके मोहन बागान दुसऱया स्थानावर असून त्यांची स्थिती चौदा सामन्यांनंतर भक्कम वाटू शकते, पण अलीकडचा त्यांचा फॉर्म सर्वोत्तम नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागला आणि मोसमातील तिसऱया पराभवास सामोरे जावे लागले आहे. अशावेळी केरळ ब्लास्टर्सविरूद्ध सफाईदार खेळ करण्यात येईल अशा आशेने एटीकेचा संघ मैदानावर उतरेल. आघाडीवरील मुंबई सिटी एफसीविरूद्धची पिछाडी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 

गेल्या चार सामन्यांत एटीके मोहन बागानला केवळ एक विजय मिळविता आला असून दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यांच्या बचावफळीची कामगिरी खालावली असून त्यांना चार गोल पत्करावे लागले आहेत. पहिल्या नऊ सामन्यांत त्यांच्याविरूद्ध केवळ तीन गोल झाले होते. आघाडीफळीने संधी गमावल्यामुळे त्यांना बहुमोल गुणांना मुकावे लागले आहेत. गेल्या चार सामन्यांत त्यांना तीनच गोल करता आले आहेत. सध्या एटीके मोहन बागानचे 14 सामन्यांतून 24 तर केरळ ब्लास्टर्सचे 14 सामन्यांतून 15 गुण झाले आहेत.

एटीके मोहन बागानने ओदिशा एफसीकडून ऑन-लोनवर मार्सेलिनियो या स्ट्रायकरला मिळविले आहे. त्यामुळे प्रशिक्षक आंतोनियो हबास यांना संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याचा विश्वास वाटतो, पण आपल्या संघाने आक्रमण भक्कम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे केरळ ब्लास्टर्स गेल्या पाच सामन्यात अपराजित आहे आणि कागदावर त्यांची बाद फेरीची संधी अजूनही कायम आहे. चौथ्या स्थानावरील संघापेक्षा ते चारच गुणांनी मागे आहेत. फॉमुळे ब्लास्टर्सचा संघ सरस वाटत असला तरी मोसमाच्या प्रारंभी हे दोन संघ आमनेसामने आले तेव्हा एटीकेएमबीची सरशी झाली होती, ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबू व्हिकुना यांना मात्र आधीच्या निकालाचा परिणाम होईल असे वाटत नाही.

Related Stories

55 रुग्णांचे अहवाल नकारात्मक

Patil_p

चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामांची लगबग

Omkar B

विशांतने साकारली ‘गोवर्धन श्रीकृष्ण ’ माटोळी

Amit Kulkarni

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Amit Kulkarni

गोविंद गावडे यांच्या कार्यकाळात प्रियोळचे भाग्य उजळले

Amit Kulkarni

त्या कार्यकर्त्यांच्या ‘तृणमूल’ प्रवेशाने काँग्रेसवर परिणाम नाही

Amit Kulkarni