Tarun Bharat

फातोडर्य़ात आज एफसी गोवा, ब्लास्टर्स यांना विजयाची प्रतीक्षा

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज रविवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एफसी गोवाचा सामना केरळ ब्लास्टर्स संघाशी होणार आहे. या दोन्ही संघाना मोसमातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

पहिल्या तीन सामन्यात एफसी गोवा व केरळ ब्लास्टर्स यांना विजय मिळविता आला नसल्याने पूर्ण तीन गुणांची कमाई करण्यासाठी दोन्ही संघ निकराचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ आतापर्यंत बारावेळा आमनेसामने आले आहेत. यात आठ विजय आणि तीन पराभव अशा कामगिरीसह एफसी गोवाने वर्चस्व राखले आहे. त्यांनी गेल्या सहा सामन्यांत अपराजित मालिका राखली असून ती कायम राखण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.

दोन्ही संघ मात्र गुणतक्त्यात तळात आहेत. त्यांना प्रत्येकी दोनच गुण मिळविता आलेले आहेत. या लढतीला सामोरे जाताना दोन्ही प्रशिक्षकांसमोर चिंता करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

केरळ ब्लास्टर्सने आतापर्यंत तिन्ही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चेंडूवरील वर्चस्वात सरस कामगिरी केली आहे, पण प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात अंतिम टप्प्यातील खेळात त्याना परिणामकारकता साध्य करता आलेली नाही. गोलच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांना संर्घष करावा लागला आहे.

यंदा खुल्या खेळातून गोल करण्यात त्यांना आतापर्यंत अपयश आलेले आहे. त्यांचे दोन्ही गोल सेट-पिसेसवर झाले आहेत. बचावफळीत किबू व्हिकूना यांचा ब्लास्टर्स संघ डळमळीत दिसतो. दोन वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या या संघाला कर्णधार सर्जिओ सिंदोंचा याच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे.

‘प्रत्येक संघाचे आव्हान वेगळे असते. खेळाच्या सारख्या शैलीमुळे एफसी गोवा संघाशी आमचे बरेच साम्य दिसते हे खरे आहे. चेंडूवर जास्त ताबा ठेवण्याची चुरस या लढतीत असेल. एफसी गोवा त्यांच्या बलस्थानांनुसार खेळतील आणि आम्ही सुद्धा हेच करू‘ असे व्हिचूना म्हणाले.

एफसी गोवाने आयएसएलमध्ये आतापर्यंत चेंडूवरील ताब्यात सर्वाधिक प्रमाण राखले आहे. यानंतरही जुआन यांच्या संघाला गेल्या दोन सामन्यांत r गुण गमवावे लागले आहेत. एफसी गोव्याला चार गोल पत्करावे लागले आहेत आणि हे सर्व गोल सेट-पिसेसवर झाले आहेत.

Related Stories

फिलिपाईन्सला नमवून कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत बाबर आझम अग्रस्थानी

Patil_p

कृणाल पंडय़ाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

माजी विजेता इंग्लंड महिला संघ उपांत्य फेरीत

Patil_p

सिंधूला पुनरागमनात पराभवाचा धक्का

Patil_p

अबु धाबी टेनिस स्पर्धेतून एलिस मर्टेन्सची माघार

Patil_p