Tarun Bharat

फातोडर्य़ात आज चेन्नईन एफसीचा सामना नॉर्थईस्ट युनायटेडशी

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर आज चेन्नईन एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात सामना होणार आहे. आपल्या पहिल्या लीग सामन्यात दोन वेळा आयएसएलचे जेतेपद मिळविलेल्या चेन्नईन एफसीने हैदराबाद एफसीचा एक गोलने पराभव करून विजयाचे पूर्ण तीन गुण कमविले होते. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे दोन सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे.

पहिला विजय हा नेहमीच चांगला असतो. सुरूवात चांगली झाल्याचे चेन्नईन एफसीची प्रशिक्षक बँडोविच म्हणाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरूद्धच्या सामन्यात आम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ आणि आमच्या खेळात आणखी सुधारणा करून असे बँडेविच म्हणाले. आम्ही नेहमीच प्रतिस्पर्धी संघांचा आदर करतो, परंतू आम्हाला मैदानात काय करायचे हे माहित आहे असे ते म्हणाले.

चालू हंगामात नॉर्थईस्ट युनायटेडने अद्याप त्यांचे खाते उघडले नसले तरी, बँडोविच पुढील सामन्यांच्या आव्हानांबद्दल जागरूक आहे आणि त्याच्या संघाने काहीही हलके घ्यावे असे बँडोविच म्हणाले. नॉर्थईस्टने गेल्या मोसमात खूप चांगली कामगिरी केली. तुम्हाला मानसिकदृष्टय़ा तयार करावे लागेल आणि खेळाडूंनी प्रत्येक खेळात पूर्ण शिस्तीत लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण प्रतिस्पर्धी संघाला धोकादायक होऊ दिल्यास सर्वकाही धोकादायक होऊ शकते, असे ते म्हणाले. चेन्नईनचा अनुभवी फुटबॉलपटू राफायल क्रॅविल्लारो पूर्ण तंदुरूस्त नाही व तो चार आठवडे खेळू शकणार नाही. 

Related Stories

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

GAURESH SATTARKAR

जणू स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर प्रगटल्या…

Amit Kulkarni

संसारच वाहून गेला.. कागदपत्रे शोधणार कुठे !

Amit Kulkarni

तेरेखोल नदी किनाऱयावरील शेती, बागायती धोक्यात

Amit Kulkarni

मोतीबिंदूबाबत जागृती माहिन्याची उद्या सांगता

Amit Kulkarni

पणजी मनपा, बहुतांश पालिकांचे कर्मचारी मार्चच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

Omkar B