Tarun Bharat

फातोडर्य़ात आज शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशाची लढत ब्लास्टर्सशी

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ओडिशा एफसीची लढत केरळ ब्लास्टर्स संघाशी होणार आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल. सध्या केरळ ब्लास्टर्सचे 16 सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी व सात पराभवाने 15 गुण झाले असून ते दहाव्या स्थानावर आहेत. शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशा एफसीचे 15 सामन्यांतून एक विजय, पाच बरोबरी आणि तऊ पराभवाने 8 गुण झाले आहेत.

ओडिशा एफसीच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत, तरीही ते स्वाभिमानासाठी खेळू शकतील. तळातील ओडिशा एफसीला सहा सामन्यांत विजय मिळालेला नाही. त्यांना मोसमात एकच सामना जिंकता आला आहे. ब्लास्टर्सविरुद्धच त्यांनी ही कामगिरी केली. त्यामुळे आता त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजयाची पुनरावृत्ती करण्याची त्यांना संधी आहे.

ओडिशा एफसीचा संघ स्वाभिनासाठी खेळणार असेल, तर दहाव्या स्थानावरील केरळ ब्लास्टर्सचा संघ बाद फेरीच्या नजिक जाण्यासाठी प्रयत्नशील असेल. ओडिशाचे प्रशिक्षक जेराल्ड पेटन यांना ब्लास्टर्स निकराचा संघर्ष करेल याची जाणीव आहे, पण दक्षिणेतील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आधीच्या सामन्यातील कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आतापर्यंत तीन सामन्यांत केरळ ब्लास्टर्सला ओडिशा एफसीविरुद्ध विजय मिळविता आला नाही.

केरळ ब्लास्टर्सकडे काही चांगले खेळाडू आहेत. डावपेचांच्या बाबतीत ते कसा खेळ करतात याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांना प्रत्येक क्षेत्रात तुल्यबळ लढत देऊ. ते 4-2-2 अशा स्वरूपाचा खेळ करतात. आम्ही तशाच पद्धतीने खेळू आणि त्यांच्यासमोरील आव्हान अवघड करू. आम्हाला दुहेरी विजयाची कामगिरी करू शकू असे वाटते, असे पेटन म्हणाले.

केरळ ब्लास्टर्स सध्या संघर्ष करत आहे. चार सामन्यांत त्यांना विजय मिळविता आला नसून सर्वाधिक 27 गोल त्यांना पत्करावे लागले आहेत. ओडिशाचे गोलच्या बाबतीत त्यानंतरचे स्थान असून त्यांच्यावर 25 गोल झाले आहेत. बचावातील दोन्ही संघांच्या समस्याही आहेत. ब्लास्टर्सने गेल्या काही सामन्यांत उत्साहवर्धक कामगिरी केली आहे, पण त्यांना संधीचा कोणताही फायदा उठविता आलेला नाही. गेल्या दोन सामन्यांत एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांच्याविरुद्ध पहिला गोल करूनही त्यांना अखेरीस पराभूत व्हावे लागले. विजयाच्या स्थितीतून त्यांनी यंदा 16 गुण गमावले आहेत. बाद फेरी गाठणे अशक्यप्राय कामगिरी वाटत असली तरी केरळ ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबू व्हिकुना यांनी आशा सोडून दिलेली नाही. उरलेल्या चार सामन्यांतून 12 गुण कमावण्याचे आमचे ध्येय आहे, पण आम्ही एका वेळी एक पाऊल टाकू आणि बाद फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या संघांच्या जवळपास जाऊ असे व्हिकुना म्हणाले.

Related Stories

डिचोली तालुक्मयात आज सोमवारी कोरोनाचे 13 नविन रुग्ण

Amit Kulkarni

कुंकळ्ळी शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानच्या कालोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

‘निर्भया’ना न्याय देण्यासाठी ओल्ड गोवा येथे मेणबत्ती मार्च

Amit Kulkarni

काँग्रेस, टीएमसीच्या ’त्या’ उमेदवारांना अपात्र ठरवा

Amit Kulkarni

इफ्फी : वास्तवाच्या संतुलनावर विश्वास नाही : दिग्दर्शक नील माधव पांडा

Archana Banage

जलस्रोतांच्या आराखडय़ातून पन्नास वर्षांचे नियोजन

Amit Kulkarni