Tarun Bharat

फातोर्डा फॉरवर्डच्या 13 उमेदवारांचे पॅनल जाहीर

Advertisements

अर्ज दाखल, फातोर्डा व कुडतरीतील प्रभागांचे भवितव्य घडविणारे पॅनल : विजय सरदेसाई

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव पालिका निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने पाठिंबा दिलेल्या फातोर्डा फॉरवर्डच्या 13 उमेदवारांचे पॅनल सोमवारी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी जाहीर केले. हे पॅनल फातोर्डा आणि कुडतरीतील प्रभागांचे भवितव्य घडविणारे असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

या पॅनलमधून फातोर्डात येणाऱया 1 ते 11 आणि कुडतरीत येणाऱया 23 आणि 25 प्रभागांसाठी उमेदवार उभे केले असून या पॅनलमध्ये सर्व धर्म आणि जातींना प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यात 70 टक्के नवे चेहरे आहेत. हे उमेदवार खऱया अर्थाने फातोर्डाचा विकास करतील, अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

हे उमेदवार लोकांच्या सांगण्यावरून निवडून काढले असून त्यामुळे लोकांकडून त्यांना चांगला पाठिंबा आहे. इतर पक्ष अजूनही उमेदवार शोधत असताना आमच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचार कधीच संपला आहे. या पॅनलमध्ये सर्वांत तरुण उमेदवार पूजा नाईक या आहेत. निवडणूक जाहीर झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशी आमचे उमेदवार ठरले होते, असे त्यांनी सांगितले.

टीम गोवा चळवळीची सुरुवात

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या सर्व उमेदवारांनी श्री दामोदराच्या देवळात जाऊन सांगणी केली. नंतर सेंट फ्रान्सिस झेवियर कपेलमध्ये प्रार्थना केली. देवांचे आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने आम्ही मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन गोवा घडविण्यासाठी आम्ही टीम गोवा ही चळवळ सुरू करणार आहोत. हे पॅनल त्याची सुरुवात आहे. गोव्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही चळवळ असेल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

या पॅनलचे उमेदवार असे-प्रभाग 1- फ्रान्सिस आग्नेलो जोनास, प्रभाग 2-जॉनी क्रॅस्टो, प्रभाग 3-लिंडन पेरेरा, प्रभाग 4-पूजा नाईक, प्रभाग 5-श्वेता सुजय लोटलीकर, प्रभाग 6-प्रवीण जना नाईक, प्रभाग 7-कुस्तोदियो डायस, प्रभाग 8-मिलाग्र नोरोन्हा, प्रभाग 9-रवींद्र नाईक, प्रभाग 10-व्हितोरिनो फर्नांडिस, प्रभाग 11-राजू उर्फ बुधाजी नाईक, प्रभाग 23-निमिषा फालेरो व प्रभाग 25-ऍड. अश्मा बी.

Related Stories

मडगाव नगरपालिकेची इमारत संवर्धन विभागात येते की नाही ?

Patil_p

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वांची आजही गरज!

Patil_p

समृद्ध संस्कृतीचा वारसा जपा

Amit Kulkarni

एका बाजूने बांधकाम पाडण्याचा आदेश, तर दुसऱया बाजूने स्थगिती!

Amit Kulkarni

भाषा, संस्कृती, साहित्य सोडून विकास म्हणजे शून्य

Amit Kulkarni

कोराना संशयित मिळाल्यानंतर बेतोडय़ात ‘हायपर टेंशन’

Omkar B
error: Content is protected !!