Tarun Bharat

फातोर्डा भाजपच्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी/ मडगाव

भारतीय जनता पक्षाने सदैव जनतेच्या हितासाठी कार्य केलेले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणखी मजबूत बनवण्याकरिता कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यात कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यप्रणालीसंदर्भात माहिती दिली जाते असे, भाजपचे प्रदेश सरचिणीस दामू नाईक यांनी सांगितले.

मठसंकुल फातोर्डा येथे कार्यकर्त्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर व इतरांची उपस्थिती होती.

जनसंघ ते भाजपचा प्रवास तसेच केंद्र सरकारच्या उपलब्धी विषयी यावेळी कार्यकर्त्यांना माहिती दिली जाते. तसेच दोन दिवस चालणाऱया या शिबीरात भाजपचे अनेक मंत्री कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

मठसंकुल फातार्डा येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात फातोर्डा, कुडतरी व नुवे या तीन मतदारसंघातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

दोघा संशयितांना अटक

Patil_p

म्हापसा बझाराची सर्वसाधारण सभा

Amit Kulkarni

फोंडय़ात मलनिस्सारणच्या चेंबरात बुडून एका कामगाराचा मृत्यू ; एक गंभीर

Omkar B

गोमंतक मराठी अकादमीची आमसभेत मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने काम करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे

Amit Kulkarni

शिवाजीराजे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

Amit Kulkarni