Tarun Bharat

‘फायझर’च्या 5 कोटी लस भारत खरेदी करणार

36 हजार किलोमीटर उंचीवरुन पृथ्वीवर ‘दृष्टी’ ठेवणार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ च्या ‘भूस्थिर’ (जिओसिंक्रोनाईझ्ड) उपग्रहाचे प्रक्षेपण गुरुवारी पहाटे 5 वाजून 43 मिनिटांनी होणार आहे, असे बुधवारी सकाळी घोषित करण्यात आले आहे. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून होईल असे स्पष्ट केले गेले.

त्यामुळे हे वृत्तपत्र वाचकांच्या हाती पडेपर्यंत प्रक्षेपणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला असण्याची शक्यता आहे. हा उपग्रह 36 हजार किलोमीटर उंचीवरुन पृथ्वीवर दृष्टी ठेवणार आहे. प्रतिदिन चार ते पाच छायाचित्रे त्याच्याकडून अपेक्षित आहेत. हवामान अनुकूल असेल तर प्रक्षेपण पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार होईल. अन्यथा त्यात काही परिवर्तन पेले जाईल, असेही नमूद करण्यग्नात आले.

भूस्थिर उपग्रह

हा उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीनेच भ्रमण करणार आहे. त्यामुळे तो एका जागी स्थिर असल्याचे भासणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः 36 हजार किलोमीटरवरची कक्षा ही भूस्थिर म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा की, या कक्षेत असणाऱया कोणत्याही वस्तूची भ्रमणगती पृथ्वीच्या भ्रमणगतीशी मिळती जुळती राहणार आहे.

या अवकाश अभियानाची शास्त्रीय संज्ञा जीएसएलव्ही-एफ 10/ ईओएस-03 असे आहे. सतीश धवन आवकाश केंद्रावर प्रक्षेपणाची सज्जता बुधवारी रात्रीच  करण्यात आली होती.  उपग्रहाचे प्रक्षेपण करणारे यान प्रक्षेपण तळावर स्थापित करण्यात आले होते. तसेच यानात इंधन भरण्याचे कामही पूर्णत्वास नेण्यात आले होते. इतर सज्जताही रात्रीच करुन ठेवण्यात आली होती.

बहुउपयोगी उपग्रह

हा उपग्रह अनेक कार्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. कृषी, वने व अरण्ये, खाणकाम, ढगांची स्थिती, हिमकडे आणि हिमनद्यांची स्थिती, समुद्र आणि त्याची स्थिती इत्यादी सर्व घडामोडींवर हा उपग्रह लक्ष ठेवणार असून कोणत्याही धोक्याची आधी जाणीव करुन देण्यासाठी सक्षम आहे. अचानक घडणाऱया नैसर्गिक घटनाही त्याच्या तीक्ष्ण दृष्टीतून सुटणार नाहीत, अशी माहिती इस्रोने दिली.

‘आकाशनेत्र’

Related Stories

आयआयटी मद्रासकडून स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम

Patil_p

राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानाचे लँडिंग

Amit Kulkarni

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ

Patil_p

महिला न्यायाधीशांचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन

Amit Kulkarni

शहनवाज हुसैन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p

विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेची 30 कोटींची कमाई

Patil_p