Tarun Bharat

फायब्रोमाइल्जियाविषयी…

स्नायू तसंच हाडांच्या दुखण्याकडे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हाडं तसंच स्नायूंची दुखणी फायब्रोमाइल्जियाचं लक्षण ठरू शकतं. या आजारात हाडं तसंच स्नायूंमध्ये तीव्र वेदनांसह झिणझिण्या येतात. सुई टोचल्यासारखी जाणीव होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या आजाराचा अधिक धोका असतो. तिशीनंतर फायब्रोमाइल्जियाचा धोका वाढतो. त्यामुळे अशी लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

फायब्रोमाइल्जिया हा अनुवांशिक आजार असल्यामुळे कौटुंबिक इतिहास असणार्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. दुखापतीनंतरही हा आजार होऊ शकतो. अतिरिक्त ताणतणावही फायब्रोमाइल्जियाला कारणीभूत ठरतात. या आजाराचं वेळेत निदान झाल्यास अधिक आराम मिळू शकतो.

फायब्रोमाइल्जियाच्या उपचारांमध्ये ड जीवनसत्त्वाचं मोठं महत्त्च आहे. ड जीवनसत्त्वामुळे हा आजार पूर्णपणे बरा झाला नाही तरी वेदनांची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी कोवळं ऊन घ्यायला हवं. ताणतणाव शक्य तितके दूर ठेवायला हवेत. यासाठी पुरेशी झोप आणि पोषक आहार घ्यायला हवा. नियमित व्यायामानेही या आजाराला दूर ठेवता येतं. ताणतणावांमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्याचा परिणाम स्नायू आणि हाडांवर होतो. फक्त फायब्रोमाइल्जियाच नाही तर उच्च रक्तदाब, हृदयविकारासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ताण कमी करण्यावर भर द्यायला हवा. याशिवाय नियमित व्यायामानेही ताणतणाव कमी होतो.

Related Stories

उन्हाळातले फॅशन फंडे

Amit Kulkarni

काय सांगतात नखं

Amit Kulkarni

थकवा दूर करण्यासाठी…

Omkar B

कलर युवर हेअर

Omkar B

चिंता काळज्या ठेवा दूर

Amit Kulkarni

बबिताला भावतो योग

Amit Kulkarni
error: Content is protected !!