Tarun Bharat

फायल फुडे धाडल्या…

ओशल ग्रामसभेत प्रत्येक प्रश्नाला हे एकच उत्तर : लोकांनी मंडळाला बरेच धारेवर धरल्याने तणाव

वार्ताहर /शिवोली

ओशेल पंचायत मंडळाकडे विविध प्रश्न विचारुन समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी मंडळाला बरेच धरोवर धरले. प्रत्येक प्रश्नाला ‘फायल फुडें धाडल्य़ा’ असे उत्तर देण्यात येत होते.

रविवारी सकाळी ओशेल पंचायतीच्या हॉलमध्ये पंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. सभेत सरपंच वंदना नार्वेकर, उपसरपंच प्रविण कोचरेकर, पंचसदस्य मंगेश चोडणकर, नूतन बाणावलीकर, ऍड. रेषल हरमलकर, महादेव हरमलकर उपस्थित होते. पंचायत सचिव चेतन चोडणकर यांनी मागील सभेचा इतीवृत्तांत वाचून दाखवून त्यावर चर्चा केली.

सभेत अनेक ग्रामस्थांनी भाग घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. ग्रामस्थांना पंचायतमंडळाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी मंडळाला बरेच धारेवर धरले. मागील ग्रामसभेत अनेक ठराव मंजूर करुन घेतले होते. त्याचे काय झाले असे ग्रामस्थ गौरेश आगरवाडेकर यांनी विचारले असता ठराव घेतलेल्या फाईल्स संबंधीत खात्याकडे पाठविण्यात आले असल्याचे पंचायत मंडळाने उत्तर दिले. गौरेश आगरवाडेकर यांनी इतर अनेक प्रश्न उपस्थित केले असता त्यांना ‘फाईल्स पुढे पाठविण्यात आले असल्याचे हेच उत्तर श्री. आगरवाडेकर यांना देण्यात आले. खुल्या गटारांवर अद्याप लाद्या बसविण्यात आल्या नाहीत. पंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी लाद्या पडून आहेत त्या आणून गटारांवर बसवाव्या असे सूचीत केले.

रहिवासी प्रकल्पांना मंजूरी

ओशेल पंचायतीच्या हद्दीत नवीन रहिवासी प्रकल्प सुरु होत आहे. गत ग्रामसभेत ग्रामस्थांना ‘आदी पाणी व वीज उपलब्ध करा’ नंतर रहिवासी प्रकल्पांना मंजूरी देण्यात यावी यावर ठराव मंजूर करुन घेण्यात होता. ग्रामस्थांना सदर सोयी उपलब्ध न करता ‘रहिवासी प्रकल्पाला’ कशी मंजूरी देण्यात आली यावर गौरेश मांद्रेकर यांनी विचारले असता प्रकल्पाची फाईल्स ‘टीसीपीकडून आली त्यामुळे पंचायतीला त्याला मंजूरी द्यावी लागली असे पंचायतमंडळाकडून उत्तर देण्यात आले.

रस्त्यांवरील अडथळे हटविण्याची मागणी

ओशेल पंचायतीच्या हद्दीतील भाटी तसेच क्षेत्रपाल रस्त्यावर अनेक अडथळे आहेत. लोकांनी आपल्या कंपाऊंडच्या बाहेर दगड ठेवले आहेत त्यामुळे वाचनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या रस्त्यांवर अनेक वर्षांपासून दगड आहेत. पंचायत मंडळाने ‘भारतीय संविधानाअंतर्गत’ कायद्यांचे पालन करुन रस्त्यांवरील अडथळे दूर करावे अशी मागणी ग्रामस्थ महेश वायंगणकर यांनी केली. तसेच वारंवार बिघाड होणारा वॉर्ड क्र. 3 मधील ट्रान्सफॉर्मरकडे लक्ष घालून स्थानिकांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा असे वायंगणकर यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व कामे दिसत नाही

मान्सून जवळ आला आहे. इतर पंचायती मान्सूनपूर्व कामे करताना दिसत आहेत. पण अद्याप पंचायत मंडळाकडून तशी कामे हाती घेतली असल्याचे दिसून येत नाही असे   वरुण धारगळकर यांनी विचारले असता मान्सूनपूर्व कामासाठी अजून निधी आला नाही व सध्या आम्ही थोडी कामे हाती घेतली आहे ती स्वखर्चान करीत असल्याचे पंचसदस्य महादेव हरमलकर यांनी श्री. धारगळकर यांना उत्तर दिले.

मेघराज खोर्जुवेकर यांनी निवार्चन अधिकारी म्हणून काम पाहिले.

Related Stories

मंत्री पावसकरांकडे खंडणी मागणारे गजाआड

Patil_p

चंदगडच्या गंधर्वगड-केरवडे परिसरात वाघ

Rahul Gadkar

गोव्यातील शेती जमीन पुन्हा लागवडीखाली आणणारः मनोज परब

Amit Kulkarni

मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण होता कामा नये

Omkar B

आल्त दाबोळीतील हवाई मार्गातील एका घराविरूध्द प्रशासनाची कारवाई

Amit Kulkarni

शांत रस्ते, सामसूम बाजार..दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट..!

Amit Kulkarni