तरुण भारत

फिडे उपाध्यक्षपदी आनंदची वर्णी शक्य

चेन्नई / वृत्तसंस्था

भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आगामी निवडणुकीनंतर फिडे उपाध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष डोर्कोविच यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यास आनंदच्या उपाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान सदर निवडणुका होणार आहेत. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या आनंदचा डोर्कोविच यांनी पुढील निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पथकात समावेश केला आहे.

Advertisements

डोर्कोविच यांनी आगामी निवडणुकीसाठी आपण अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरणार असून विश्वनाथन आनंद उपाध्यक्षपदाचा उमेदवार असेल, असे जाहीर केले. याशिवाय, झू चेन (खजिनदार), जोरॅन ऑलिन-जान्सन (उपाध्यक्ष), व माहीर मेम्मेदोव्ह यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली.

मागील महिन्यात दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आनंदने डोर्कोविच पुन्हा रिंगणात उतरत असतील तर आपला त्यांना पाठिंबा असेल, असे म्हटले होते. आनंदने आगामी ऑलिम्पियाडमध्ये स्वतः खेळण्याऐवजी संघाला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला असून नंतर तो दि. 17 ते 24 मे या कालावधीत वॉर्सा येथे होणाऱया ग्रँड चेस टूरमध्ये सहभागी होणार आहे. त्यापूर्वी चेस ऑलिम्पियाडदरम्यान 94 वी फिडे काँग्रेस देखील आयोजित केली गेली आहे.

Related Stories

एएफसीच्या कोरोना व्हायरस मोहिमेत भुतियाचा समावेश

tarunbharat

ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि शर्यत लांबणीवर ?

Patil_p

महिला मुष्टियुद्ध संघाच्या प्रशिक्षकपदी भास्कर भट्ट

Patil_p

वुल्व्ह्सची अर्सेनलवर मात, जिमेनेझला दुखापत

Patil_p

भारतीय संघाने निर्भयपणे खेळण्याची गरज : स्टिमॅक

Amit Kulkarni

लखनौ सुपरजायंट्सचा हैदराबादला पराभवाचा धक्का

Patil_p
error: Content is protected !!