Tarun Bharat

फिलिपाईन्सला नमवून कोरिया अंतिम फेरीत

Advertisements

पुणे : एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोरियाने दर्जेदार खेळाच्या जोरावर फिलिपाईन्सचा 2-0 असा पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्टेडियममध्ये गुरूवारी झालेल्या या पहिल्या उपांत्य सामन्यात कोरियातर्फे चो सो हेयुन आणि सन हेवा येवून यांनी पूर्वार्धात प्रत्येकी एक गोल नोंदविला. या स्पर्धेत जपान आणि माजी विजेत्या चीनबरोबर होणाऱया दुसऱया उपांत्य सामन्यातील विजयी संघाबरोबर कोरियाचा रविवारी अंतिम सामना खेळविला जाईल. 2023 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱया फिफाच्या महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फिलिपाईन्सने पहिल्यांदाच आपली पात्रता सिद्ध केली आहे.

Related Stories

लक्ष्य सेन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

राणी रामपालचे पुनरागमन, सविताकडे नेतृत्व

Patil_p

डेव्हिस चषक -क्रोएशिया उपांत्य फेरीत

Patil_p

पराभव अफगाणचा, हार भारताची!

Patil_p

विंडीजचा सराव सामना : रेमन रिफेरचे 11 चेंडूत 5 बळी

Patil_p

2021 मध्येही ऑलिम्पिक अशक्य?

Patil_p
error: Content is protected !!