Tarun Bharat

फिलिपाईन्स पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ पुणे

येथे सुरू असलेल्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत फिलिपाईन्सने चिनी तैपईचा रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. या सामन्यात निर्धारित आणि त्यानंतर जादा वेळेच्या कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करत सामन्याचा निकाल लावला.

फिलिपाईन्स या दक्षिणपूर्व आशियाई संघाने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढय़ चिनी तैपईचा पराभव तर केलाच तसेच 2023 साली होणाऱया फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आपले तिकीट आरक्षित केले. आता या स्पर्धेत †िफलिपाईन्सचा उपांत्य फेरीचा सामना गुरूवारी कोरिया प्रजासत्ताक संघाबरोबर खेळविला जाणार आहे.

या सामन्यातील पराभवामुळे पुढीलवर्षी होणाऱया फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेसाठी चिनी तैपई संघाला आगामी तीन संघांच्या प्ले ऑफ लढतीतील निर्णयावर अवलंबून रहावे लागेल. राऊंड रॉबिन पद्धतीच्या टप्याअखेर आघाडीचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल तर उर्वरित दोन संघाना आंतर कॉन्फेडरेशन प्ले ऑफ गटात खेळावे लागेल. 2022 च्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत चिनी तैपई आणि †िफलिपाईन्स या दोन संघानी अनुक्रमे अ आणि ब गटात दुसरे स्थान मिळविले आहे.

रविवारच्या सामन्यात 9 व्या मिनिटाला †िफलिपाईन्सने चिनी तैपेईच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण तैपेईच्या भक्कम बचावफळीने †िफलिपाईन्सला गोल करण्यापासून रोखले. 19 व्या मिनिटाला तैपेईने †िफलिपाईन्सच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारली पण †िफलिपाईन्सच्या गोलरक्षकाने तैपेईकडून मारण्यात आलेला फटका रोखला. 23 व्या मिनिटाला मिळालेली गोल करण्याची संधी तैपेईने गमविली. 37 व्या मिनिटाला †िफलिपाईन्सच्या बोल्डेनने मारलेला फटका तैपेईच्या गोलपोस्टच्या दांडीवरून बाहेर गेला. मात्र †िफलिपाईन्सने 48 व्या मिनिटाला तैपेईची बचावफळी भेदत आपले खाते उघडले. कॅटरिना गुलियोने हेडरद्वारे दिलेल्या पासवर क्वेझदाने तैपेईच्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडला. 82 व्या मिनिटाला पिंगने 25 यार्डावरून चीन तैपेईचा गोल करीत बरोबरी साधली. निर्धारित वेळेत आणि त्यानंतर जादा वेळेमध्ये दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. पेनल्टी शूटआऊटमध्ये †िफलिपाईन्सने चिनी तैपेईचा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तसेच पुढील वर्षीच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

Related Stories

प्रशिक्षक क्लुसनरच्या वेतनामध्ये कपात

Patil_p

बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेसला प्राधान्य देणार

Patil_p

राजस्थान-लखनौ ब्लॉकबस्टर लढत आज

Patil_p

कॅनडा डेव्हिस चषकाचा पहिल्यांदाच मानकरी

Patil_p

2020 मधील बॅलन डी ओर पुरस्कार रद्द

Patil_p

प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार राहुल द्रविड!

Amit Kulkarni