Tarun Bharat

फिलिपिन्स : कॅटॅन्डुआस बेटाला गोनी चक्रीवादळाचा तडाखा

Advertisements

16 जणांचा मृत्यू, 3 बेपत्ता 

ऑनलाईन टीम / मनिला : 

फिलिपिन्समधील कॅटॅन्डुआस बेटाला रविवारी गोनी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून,16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बेपत्ता झाले आहेत. 

या वादळात हवेचा वेग ताशी 235 किमी इतका होता. हे वादळ दक्षिण चीन समुद्रातून फिलिपिन्सच्या दिशेने आले होते. पहिल्या तडाख्यानंतर वादळाचा वेग कमी झाला असून, हे चक्रीवादळ आता ल्यूझॉन बेटाकडे सरकत आहे. मात्र, वादळाचा धोका अजून टळलेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव फिलिपिन्समधील अंदाजे 10 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक गावातील वीज यंत्रणा कोलमडून पडली आहे. सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला असून, वादळाचा धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

…अशी महामारी पाहिलीच नव्हती!

Patil_p

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

Abhijeet Shinde

काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात

Abhijeet Shinde

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन

datta jadhav

भारतीय वंशाच्या CEO चा एक कॉल आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार

Abhijeet Shinde

ब्रह्मांडातील कृष्णविवरांचा नकाशा तयार

Patil_p
error: Content is protected !!