Tarun Bharat

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही एसएसएलसी परीक्षा ‘प्रवेशपत्र’ द्या : शिक्षणमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात एसएसएलसी परीक्षा १९ जुलै आणि २२ जुलै रोजी होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, शुल्क न भरल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला एसएसएलसी (इयत्ता दहावी) परीक्षेचे हॉल तिकीट नाकारता येणार नाही याची खातरजमा केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना एसएसएलसी परीक्षा हॉल तिकीट देण्याची व्यवस्था केली जावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

“एसएसएलसी परीक्षार्थींना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) योग्य कारवाई करतील. फी भरण्याच्या मुद्द्यांमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्याची संधी नाकारली जाणार नाही, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास वर्वांगीं असेल असे निरीक्षण ठेवून कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाकडे (केएसईईबी) सार्वजनिक शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे, ”असे मंत्री कुमार यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर दिवसभरात सार्वजनिक शिक्षण विभाग (डीपीआय) आयुक्त व्ही. अनबुकुमार यांनी एक परिपत्रक काढले की सर्व हॉल तिकिटे २९ जून रोजी केएसईईबी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आणि त्यानंतर शाळा संस्थांचे प्रमुख त्यांना दिलेला लॉगइन कोड वापरुन ते डाउनलोड करू शकतील.

Related Stories

बेंगळूर: बीटीपीची वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम

Archana Banage

शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत घाई नाही

Amit Kulkarni

सुमारे एक लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण

Archana Banage

कर्नाटक: नोव्हेंबर अखेरपर्यंत पात्र नागरिकांना कोरोना लस देण्याचे लक्ष्यः आरोग्यमंत्री

Archana Banage

कोरोना मदतकार्यासाठी मंत्री एक वर्षाचे वेतन देणार

Archana Banage

हेब्बाळकर – निंबाळकर यांना पुन्हा संधी

Sandeep Gawade
error: Content is protected !!