Tarun Bharat

फुटक्या तळयात उडी घेवून वृद्धेची आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

येथील फुटके तळय़ात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उडी टाकून शारदा कामत (वय 76, रा. 1020 शनिवार पेठ, सातारा) या वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना घडली. सात वाजता आत्महत्या केल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. शाहुपूरी पोलिसांना याची माहिती देवून लगेच शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवार पेठेत राहणाऱया शारदा कामत या पहाटे साडे पाच वाजता घरात नसल्याचे त्यांच्या मुलास व नातेवाईकांना निदर्शानास आले. त्यांचा शोध घेण्याकरता बाहेर पडले. तोपर्यंत शारदा कामत यांनी फुटक्या तळय़ात उडी मारली अन् त्यांनी पाण्यात उडी टाकताना नेमकी तोंडावरच टाकली. साडीचा फुगा झाल्याने त्या पाण्यावरच तरंगत राहिल्या. परंतु तोंडावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या उडी मारताना तळय़ाच्या परिसरात कोणीही नव्हते. परंतु सकाळी वॉकींगला जाणाऱया स्थानिक नागरिकांना दोन जण कोणाची चौकशी करतात म्हणून त्यांना विचारणा केली असता त्यांची वृध्द आई घरात नसल्याने शोध घेतात, असे समजले. त्यावर नगरसेवक धनंजय जांभळे यांनी तळय़ाकडे पाहिले असता तळय़ात एक वृद्ध महिला तरंगत असल्याचे दिसले. त्यावर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोलिसांना ही माहिती दिली. त्या वृध्द महिलेचा मृतदेह आकाश बनपट्टे, संदीप साळुंखे, कमलाकर भोंडे, नितीन गुजर यांनी बाहेर काढला. शाहुपूरी पोलिसांत या घटनेची नोंद होताच शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शारदा कामत यांना दोन मुले, दोन मुली असा परिवार असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Related Stories

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ातील पहिला पॉझिटिव्ह कोरोनामुक्त !

Abhijeet Shinde

चिंता वाढली : सोलापुरात आढळले २० नवे रुग्ण,14 वा बळी

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : महिलांवरील अत्याचारांविरोधात ‘शक्ती कायदा’

Rohan_P

”हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार?”

Abhijeet Shinde

राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच; ठाकरे सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!