Tarun Bharat

फुटपाथ रिकामी करण्याची फेरीवाल्यांना सूचना

हनुमाननगर चौकात फुटपाथवर अतिक्रमण प्रकरणी मनपाची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील विविध रस्त्यांवर फेरीवाले आणि भाजी विपेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सुशोभिकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील फुटपाथवर व्यवसाय थाटून ठाण मांडले आहे. अशा सर्व व्यावसायिकांना हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. समादेवी गल्लीत रस्त्यावर बसणाऱया फेरीवाल्यांना हटविण्यात आले. हनुमाननगर येथील फेरीवाल्यांना फुटपाथ रिकामी करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असून विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून नवीन फुटपाथ बनविण्याचे काम करण्यात आले आहे. स्मार्ट रस्ते बनविण्यासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, या फुटपाथवर फेरीवाले आणि भाजी विपेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत. परिणामी फुटपाथ पादचाऱयांसाठी की फेरीवाल्यांसाठी, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. फुटपाथवरून ये-जा करण्यासाठी पादचाऱयांना जागा सोडण्याऐवजी बहुतांश ठिकाणी फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले आहेत.

शहरातील सर्रास फुटपाथवर व्यवसाय थाटण्यात आल्याने पादचाऱयांना अडचण बनली आहे. त्यामुळे पादचारी रस्त्यावरून चालताना दिसून येतात. फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणाबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी आक्षेप घेऊन महापालिकेत बैठक घेतली होती. फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांना केली होती. पण याची दखल अद्याप घेण्यात आली नव्हती. मात्र, हनुमाननगर परिसरात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाडय़ा, फळ विपेते, भाजी विपेते आणि फेरीवाल्यांनी संपूर्ण फुटपाथला व्यावसायिक कट्टा बनविला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी फुटपाथवरून फिरणाऱया नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. पादचाऱयांना ये-जा करण्यास अडचण होत असल्यामुळे फुटपाथ रिकामी करण्याची सूचना सर्व फेरीवाल्यांना करण्यात आली आहे. हनुमाननगर व येथील चौकात फुटपाथवर किंवा रस्त्याशेजारी व्यवसाय थाटल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा फेरीवाल्यांना देण्यात आला आहे.

समादेवी गल्लीतील भाजी विपेत्यांना रहदारी पोलिसांनी हटविले समादेवी गल्लीतील रस्त्यावर फेरीवाले व भाजी विपेते ठाण मांडत असल्याने  अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. फेरीवाल्यांना बसण्यासाठी रस्त्याशेजारी मार्किंग करून देण्यात आले आहे. पांढऱया पट्टीच्या आतील बाजूस भाजी विपेते व फेरीवाल्यांना बसण्याची सूचना केली होती. तरीदेखील भाजी विपेते आणि फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. सातत्याने सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने बुधवारी सकाळी रहदारी पोलिसांनी फेरीवाले व भाजी विपेत्यांना हटविण्याची कारवाई केली. ज्या ठिकाणी वाहनांना ये-जा करण्यास रस्ता अरुंद आहे त्या ठिकाणांच्या भाजी विपेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. 

Related Stories

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवडीसाठी हवा ‘सर्वोच्च’ आदेश

Amit Kulkarni

विष्णू गल्ली, वडगाव येथे आर्सेनिक अल्बम-30 गोळय़ांचे वाटप

Patil_p

सर्व्हेसाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी दाखविला हिसका

Amit Kulkarni

हरणाच्या अवयवांची तस्करी : दोघांना अटक

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात गुरुवारी पाच कोरोना बाधित सापडले

Patil_p