Tarun Bharat

फुटबॉलच्या सामन्यादरम्यान कोसळली प्रेक्षक गॅलरी, 200 हून अधिक जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम / तिरूअनंतपुरम :

केरळच्या मलप्पुरम येथील पुंगोड येथे एका फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामधील 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूरजवळील पुंगोड येथे फुटबॉलचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्यांसाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात आली होती. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास जळपास दोन हजार लोक हे सामने पाहण्यासाठी मैदानात हजर होते. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वीच पेक्षकांनी भरलेली गॅलरी कोसळली. या दुदैवी घटनेत 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामधील 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेच्या चौकशीची मागणी होत असून, पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

पाकिस्तानी, बांग्लादेशींविरोधात 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा

prashant_c

अमरनाथ यात्रामार्गावर अतिदक्षतेचे आदेश

Patil_p

पुष्पा 2.0 बघाय लागतंय…

Nilkanth Sonar

केवळ पुरी येथील रथयात्रेला अनुमती

Patil_p

जनतेच्या सहकार्यामुळे देशात कोरोनाची स्थिती चांगली

Patil_p

पंतप्रधान मोदी साधणार देशवासियांशी संवाद

Patil_p
error: Content is protected !!