Tarun Bharat

फुटबॉलपटू रॅमोस कोरोना बाधित

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

स्पेनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच रियल माद्रीद फुटबॉल संघाचा कर्णधार सर्जीओ रॅमोस याला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर माहिती रियल माद्रीद क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांच्या कालावधीत रॅमोसला वारंवार दुखापतीच्या समस्या जाणवत होत्या. आता कोरोना समस्येची त्यात भर पडली आहे. 35 वर्षीय रॅमोसची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. रॅमोसला काही दिवसासाठी होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. रॅमोसने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 670 सामने खेळले असून 2005 पासून रियल माद्रीद संघाकडून खेळताना 101 गोल नोंदविले आहेत.

Related Stories

अमेरिकन टेनिस स्पर्धेत व्हीनसला वाईल्ड कार्ड

Amit Kulkarni

फिफाची ब्लॅटरविरूद्ध फौजदारी तक्रार

Patil_p

इमा रॅडूकनूची सराव स्पर्धेतून माघार

Patil_p

कोलकात्याविरुद्ध लखनौचे पारडे जड

Patil_p

रुमानियाचा डेव्हिड पोपोविसीचा नवा विश्वविक्रम

Patil_p

सेरेनाकडून विम्बल्डनमध्ये पुनरागमनाचे संकेत

Patil_p