Tarun Bharat

फुटबॉलपटू सलाहला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूल क्लबचा हुकूमी स्ट्रायकर मोहम्मद सलाह याला कोरोनाची बाधा झाल्याचे या क्लबच्या व्यवस्थापकाने सांगितले.

आफ्रिका नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या इजिप्त आणि टोगो यांच्यातील पात्र फेरीचा सामना होणार असल्याने इजिप्तच्या सलाहची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याने आढळून आले, अशी माहिती इजिप्त फुटबॉल संघटनेतर्फे देण्यात आली. सलाहची प्रकृती स्थिर असून त्याच्यात कोरोनाची लक्षणे फार प्रभावी दिसत नसल्याचे सांगण्यात आले. इजिप्त संघातील सलाह वगळता इतर फुटबॉलपटू कोरोना चाचणीत निगेटिव्ह ठरले असल्याचे इजिप्तच्या फुटबॉल फेडरेशनने सांगितले आहे. सध्या सलाहला त्याच्या खोलीमध्येच आयसोलेट राहण्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

तिरंदाजपटू पूजा अंतिम फेरीत

Patil_p

सित्सिपस-व्हेरेव्ह यांच्यात उपांत्य लढत

Patil_p

कनिष्ठ विश्वचषक हॉकी : अर्जेन्टिनाला जेतेपद

Patil_p

विनेश फोगटची शिबिरातून माघार

Patil_p

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

Archana Banage

गुगलची पै.खाशाबा जाधवांना डुडलद्वारे मानवंदना

Patil_p