Tarun Bharat

फुटबॉलपटू सुनील छेत्री कोरोना बाधित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीला कोरोनाची बाधा झाली अहे. आता दुबईत 25 मार्च रोजी होणाऱया भारत आणि ओमान यांच्यातील मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात तो खेळू शकणार नाही. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बेंगळूर एफसी संघाकडून आघाडीफळीत खेळणाऱया सुनील छेत्रीने गुरूवारी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे कळविले आहे. आपली प्रकृती चांगली असून काळजी करण्याची गरज नसल्याचे छेत्रीने  ट्विटरवर म्हटले आहे. ’डॉक्टरी इलाज चालू असून लवकरच मी पुन्हा सामने खेळण्यास सज्ज होईन.’ कोरोना चाचणीत छेत्री पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आता त्याला काही दिवस कोरोना संदर्भातील नियमांचे कडक पालन करावे लागेल. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत छेत्रीने आपला शेवटचा सामना 25 फेब्रुवारी रोजी गोव्यात खेळला होता. मात्र बेंगळूर एफसी संघाला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली नाही. 2020-21 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात छेत्रीने 20 सामन्यात 8 गोल नोंदविले आहेत.

Related Stories

ऑस्ट्रेलिया 24 वर्षांनंतर पाकिस्तान दौरा करणार

Patil_p

मोंगिया, मनिंदर, रात्रा, दास निवड सदस्यांसाठी इच्छुक

Patil_p

नेमबाजी शिबीराला साईची अधिकृत मान्यता

Patil_p

चौथ्या दिवशीही पाऊस ‘जिंकला’!

Patil_p

बिहारचा एक खेळाडू ‘पॉझिटिव्ह’

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत चीन विजेता

Patil_p