Tarun Bharat

फुटबॉल जपूण ठेवा… हुल्लडबाजी फार झाली

केएसए लीगच्या निकालानंतर सच्चा फुटबॉलपेमींची भावना : संघांच्या बदललेल्या स्ट्रॅटजीचेही कौतुक : अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याचे आवाहन

संग्राम काटकर/ कोल्हापूर

कोरोनामुळे दोन वर्षे कोल्हापुरातील फुटबॉल स्पर्धा थांबल्या असल्या तरीही फुटबॉल फिव्हर मात्र फुटबॉलप्रेमींच्या मनात आजही कायम आहे हे केएसए लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांवेळी झालेल्या जल्लोषातून दिसून आला. कोरोनाची भीती झटकून गुरुवारी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी झालेली मनाला सुखद धक्का देऊन गेली आहे. वैशिष्ठय़ म्हणजे आयएसएलमध्ये ज्या स्टॅटर्जीने फुटबॉल सामने खेळले जातात, तशी स्टॅटर्जी घेऊन सामने खेळण्याकडे संघांचा कल वाढल्याचे ही दिसून आले आहे. संघ समर्थकही टाळ्या, शिट्टयाच्या साथीने दाद देत खेळाडूंना चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहित करु लागले आहे. मैदानात आडव्या पद्धतीने पासिंग करत विरुद्ध संघांवर चाली करण्याची खेळाडूंमधील चुणूकही वाखाणण्याजोगी आहे.

चालींच्या स्टॅटर्जींमधून प्रशिक्षक खेळाडूंकडून तयारी करुन घेत आहेत, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता फुटबॉल जपून ठेवा…हुल्लडबाजी फार झाली, असे म्हणायची वेळ आली आहे. पेठापेठांमधील तालीम व मंडळाचे 16 फुटबॉल संघ असणे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. या संघांनी छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर जीगरबाज खेळ करुन कोल्हापूरी फुटबॉलची प्रतिष्ठा वाढवली आहे. प्रत्येक सामन्यात पेठापेठांतील टोकाची ईर्ष्या ही फुटबॉल फिव्हर वाढण्यासाठी उपयोगी असली तरी ईर्ष्येतून होणारे वाद काही मिटलेले नाहीत. हे वाद फुटबॉलला बदनाम करत आहेत, हे संघ समर्थकांनी केव्हातरी जाणून घ्यावे लागणार आहे. केएसए फुटबॉल स्पर्धेतील 7 मार्च रोजी झालेल्या सामन्यात आमच्या संघावर 2 गोल करुन आनंद का व्यक्त केलास याचा मनात राग धरुन शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूला जीवे मारण्याची दिली गेलेली धमकी फुटबॉल फिव्हरलाच नव्हे तर खिलाडूवृत्तीलाही गोलबोट लावून गेली आहे.

गेल्या 16 मार्च रोजी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या सामन्यावेळी ही हुल्लडबाज व मद्यपी संघ समर्थकांनी बक्षीस जाहीर करण्याच्या कारणारुन निवेदक विजय साळोखे यांना लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर सामना संपल्यानंतर मंगळवार पेठेतील साळोखे यांच्या घरावर दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार केला. याशिवाय आपल्या संघाने गोल केल्यानंतर विरुद्ध संघांच्या समर्थकांना अश्लिल हावभावातून हिनवण्याचा प्रकारही सतत घडले आहेत. पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांना अपमानीत करण्यात काही खेळाडूंबरोबर संघ समर्थकही पटाईत असल्याचे प्रकर्ष्याने दिसून आले. हाय व्होल्टेज सामन्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असायचा. पण पोलीसांकडून हुल्लडबाजांवर जी कारवाई होणे अपेक्षित होते ती मात्र झाली नाही. त्यामुळेच हुल्लडबाज संघ समर्थक पंच, विरुद्ध संघांच्या बिनधास्तपणे शिवीगाळ करत आमच्याकडे खिलाडूवृत्ती नाही हे दाखवून देत आहे.

मुळात कोरोनामुळे दोन वर्षे थांबलेला फुटबॉल सुरु करण्यासाठी केएसएसह संघांच्या पदाधिकाऱयांना जिल्हा प्रशासनाकडे अक्षरश गयावया करावी लागली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाप्रेक्षक सामने खेळवण्याची तयारी दाखवून केएसएने जिल्हा प्रशासनाकडून फुटबॉल हंगाम सुरु करण्याची परवानगी मिळवली. हे माहिती असूनही नाहक ईर्ष्या आणि वाद करुन स्पर्धेला गोलबोट लावण्याचा प्रकार हुल्लडबाज थांबवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत, हे कोल्हापुरी फुटबॉलचे दुदैवच म्हणावे लागले. समर्थकांच्या मनस्थितीत बदल झाला तर मात्र फुटबॉलचे अस्तित्व धोक्यात येणार ही वस्तुस्थिती आहे.

धडक कारवाईची गरज…

पूर्वीच्या सामन्यावेळी संघ समर्थकांत स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीतील होणारी मारामारी सर्वांनी पाहिली आहे. पण आता खेळाडूंच्या घराकडे जाऊन त्याला जीवे मारण्याची खुमखुमी संघ समर्थकांनी दाखवून देत आपली दहशत निर्माण करण्याचा नवा प्रकार सुरु केला आहे. हा प्रकार पाहून निस्सीम फुटबॉलप्रेमी वैतागून गेले आहेत. हा प्रकार वेळीच मोडून काढला गेला नाही, कोल्हापूरी फुटबॉलचे भविष्यच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. असे ही फुटबॉलप्रेमी सांगत आहेत. शिवाय पोलीस प्रशासनाला एकदा नव्हे तर दहादा धडक करावाईचा बडगा उगारुन दहशत माजवणाऱया वटणीवर आणावे लागेल, अशी ही लोकभावना सध्या व्यक्त होऊ लागली आहे.

Related Stories

तिलारी कालव्याच्या सेतूवरुन पडून गोव्याचा तरुण ठार

Archana Banage

कोल्हापूर : हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत कारखान्यास आग; सुमारे १० कोटींचे नुकसान

Archana Banage

…तेंव्हा पालकमंत्र्यांनी गोकुळच्या लौकिकात भर टाकली का?

Archana Banage

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर फडणवीस म्हणाले, “मला खात्री…”

Archana Banage

सांगरूळ येथे शेतकऱ्यांच्या सहकार्याने कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरू

Archana Banage

कोल्हापूर महिला संघाची राज्य रग्बीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक

Kalyani Amanagi