Tarun Bharat

फुलांच्या वर्षावात विद्यार्थी शाळेत दाखल

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजल्या ः मिठाईचे वाटप करून स्वागत

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

उन्हाळी सुटीनंतर सोमवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजल्या. फुलांच्या वर्षावात विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजविण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारावर पाना-फुलांची तोरणे, भव्य रांगोळी, विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

10 एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुटी देण्यात आली होती. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 1 हजार 874 प्राथमिक तर 506 माध्यमिक शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होणार यासाठी मागील दोन दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली. शाळांची स्वच्छता झाल्यानंतर नवीन भीत्तीपत्रके चिकटविणे, स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विद्यार्थी शाळेत दाखल होताच चॉकलेट व गोड पदार्थ त्यांना देण्यात आले. पहिल्या दिवसापासूनच मध्यान्ह आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला.

महिन्यानंतर आपल्या मित्रांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर दिसत होता. बऱयाच मंडळांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळांमध्ये उपस्थिती कमी असली तरी अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावषी सेतुबंध नसल्यामुळे थेट अभ्यासक्रम शिकविण्यास शिक्षकांनी सुरुवात केली आहे. पुस्तकांची कमतरता असल्याने बुकबँकेची मदत घेतली जात आहे.

पहिल्याचदिवशी संख्या रोडावली

महिन्याभराच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. परंतु सोमवारी बऱयाच गावच्या जत्रा व विवाह सोहळे असल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. पहिल्यादिवशी ग्रामीण भागात 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मंगळवारपासून उपस्थिती वाढेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

Related Stories

भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी झटताहेत दुर्गसेवक

Amit Kulkarni

बायपास रस्त्यामुळे बसणार पुराचा फटका

Amit Kulkarni

सरकारची अवस्था नाविक नसलेल्या बोटीसारखी : दिनेश गुंडूराव

Abhijeet Shinde

लॉकडाऊनचे नियम पाळतो, पण आम्हालाही सुविधा द्या

Patil_p

बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 21 धावांनी विजय

Amit Kulkarni

शास्त्रीनगर येथील नाल्यांची साफसफाई

Patil_p
error: Content is protected !!