Tarun Bharat

’फॅमिली राज’ ला भाजपकडून प्रोत्साहन

आप नेते सिद्धेश भगतकडून निषेध

प्रतिनिधी /पणजी

पॅमिली राज संपविण्यासाठी 2012 मध्ये परिवर्तन लाट 1.0 आणणाऱया भाजपने आता 2022 मध्ये स्वतःच पॅमिली राजला प्रोत्साहन देणे सुरू केले असून या डबल इंजिनचा आम आदमी पक्षाने जोरदार निषेध केला आहे. हे पॅमिली राज संपविण्यासाठी परिवर्तन लाट 2.0 आणण्याची गरज आहे, असे मत आम आदमी पार्टीचे राज्य युवा समन्वयक सिद्धेश भगत यांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पॅमिली-राज ला प्रोत्साहन देणाऱया भाजपचा त्यांनी यावेळी निषेध केला. 2012 मध्ये याच भाजपने पॅमिली राज संपवण्यासाठी परिवर्तन लाट 1.0 आणली. एका दशकानंतर हाच पक्ष आता एका कुटुंबात दोन दोन उमेदवारी देऊन पॅमिली राजला प्रोत्साहन देत आहे असा आरोप भगत यांनी केला.

गेल्या वषी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पॅमिली राज संपविण्याचे वचन दिले होते. आज तेच सरकार राणे आणि मोन्सेरात यांच्या कुटुंबात दोन दोन उमेदवारी देत आहे. हा प्रकारच आश्चर्यकारक असून भाजपला पॅमिली राज चा अर्थ तरी माहित आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

घरोघरी दोन उमेदवार हेच डबल इंजिन सरकार

’घरोघरी दोन उमेदवार हेच भाजपचे डबल इंजिन सरकार’ असा याचा अर्थ आहे, असे सांगून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ’डबल-इंजिन म्हणजे पती-पत्नीला उमेदवारी देऊन दुहेरी भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणे’ असाही त्याचा अर्थ होतो, असे भगत म्हणाले. भाजपने ज्या पद्धतीने राणे आणि मोन्सेरात पती-पत्नीला उमेदवारी वाटप केले, ते औपचारिक निवडणुकीची उमेदवारी नसून जोडप्यांसाठीच्या व्हॅलेंटाईन डे पार्टीच्या तिकीटासारखे दिसते असा टोमणा त्यांनी हाणला.

40 पैकी 14 मतदारसंघ आता कुटुंबातील सदस्यांना दिले जात आहेत, जे एकूण 35 टक्के आहेत. शिवाय, कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या विश्वासार्हतेच्या आधारे तिकीट दिले जात आहे. असे आप युवा विंगचे अध्यक्ष पूजन मालवणकर म्हणाले. पर्रा येथील कार्यालयात बसून शिवोलीची निवडणूक कशी लढवता येते याचे डिलायला लोबो हे उत्तम उदाहरण आहे अस ते पुढे म्हणाले.

Related Stories

योगबद्दल जागृती करण्यात पतंजली योगपीठचे योगदान मोठे

Amit Kulkarni

जबाबदारी ओळखून आदर्श व्यक्ती बना : रमेश तवडकर

Amit Kulkarni

धारगळ येथे झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

राऊल पेरेरा केपे पालिका रिंगणात उतरण्याची शक्यता मावळली

Amit Kulkarni

पणजीतील लसीकरण पेंद्र आजपासून डॉनबॉस्को हायस्कूलात

Amit Kulkarni

रामराव वाघ यांचा आपमध्ये प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!