Tarun Bharat

फेडररचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

वृत्तसंस्था/ कतार

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या इक्सॉन मोबील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसचा अनुभवी आणि ज्येष्ठ टेनिसपटू रॉजर फेडररचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. जॉर्जियाच्या बॅसिलासेव्हेलीने फेडररचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

गुरुवारी झालेल्या सामन्यात बॅसिलासेव्हेलीने रॉजर फेडररवर 3-6, 6-1, 7-5 अशी मात करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात 40 वर्षाच्या उंबरठय़ावर असलेल्या फेडररची दमछाक झाल्याचे जाणवले. तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर टेनिसमध्ये पुनरागमन करणाऱया फेडररला या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नाही. या सामन्यात फेडररने पहिला सेट जिंकून आघाडी मिळविली होती. पण बॅसिलासेव्हेलीने दुसरा सेट एकतर्फी जिंकून बरोबरी साधली तिसरा आणि शेवटचा सेट अटीतटीचा झाला. बॅसिलासेव्हेलीने तीन मॅच पॉईंटस् वाचवत फेडररचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरात स्पेनमध्ये

Patil_p

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : सेरेना, मरे, मुगुरुझाची विजयी सलामी

Patil_p

कोरोनामुळे फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन

prashant_c

भारतीय महिलांचा एकतर्फी विजय

Patil_p

खरी लढत दिल्ली-पंजाबच्या ‘पॉवर हिटर्स’मध्येच!

Patil_p

हॉकीपटूंसाठी एफआयएचची मार्गदर्शक सुची

Patil_p