Tarun Bharat

फेमिनाच्या सर्वोत्तम महिलांच्या यादीत सामंथा

Advertisements

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नागा चैतन्यची पत्नी सामंथा अक्किनेनी मागील काही काळापासून स्वतःचे वैवाहिक संबंध आणि घटस्फोटाच्या वृत्तावरून चचेंत आहे. अशा स्थितीत तिच्या चाहत्यांसाठी मोठी खूषखबर समोर आली आहे. फेमिनाच्या 40 सर्वोत्तम महिलांच्या यादीत सामंथाने स्थान मिळविले आहे.

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारी सामंथा सातत्याने सोशल मीडियावर सपीय आहे. फेमिना फॅब्युलस 40 मध्ये स्थान मिळविणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे म्हणत सामंथाने आभार मानले आहेत.

4 फिल्मफेयर, 2 नंदी, 4 साउथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड्स आणि तीन सिनेमा अवॉर्ड्स प्राप्त करणारी सामंथा ही तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. सामंथाला तिच्या अभिनयासह सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जाते. 2014 मध्ये तिने प्रत्युषा सपोर्ट ट्रस्ट स्थापन करत महिला आणि मुलांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम हाती घेतले होते. याचबरोबर सामंथाने हैदराबादमध्ये एक प्री-स्कूल, एकम अर्ली लर्निंग सेंटर देखील सुरू केले आहे.

Related Stories

प्रतीक्षा संपली- ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

Patil_p

‘झिम्मा’चा खेळ रंगणार 19 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

Patil_p

‘द स्टेट प्लेट’चे घवघवीत यश

Amit Kulkarni

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ! आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Tousif Mujawar

दिलीप कुमार यांची आठवण ; पवारांनी सांगितला पहिल्या भेटीचा जेजुरीतील ‘तो’ किस्सा

Archana Banage

ज्येष्ठ अभिनेते – निर्माते महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात!

Tousif Mujawar
error: Content is protected !!