Tarun Bharat

फेम फिएस्टा -उत्सव महिलांचा

Advertisements

उत्सव सखीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा फेम फिएस्टा सोहळा म्हणजे बेळगावातील महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. याही वषी रविवारी पार पडलेल्या या सोहळयाने महिला वर्गाला खरेदीबरोबरच कलाविष्कार सादर करण्याची संधी लाभली. यामुळे यंदाचा फेम फिएस्टा हा सोहळा लक्षवेधी ठरला.

डॉ. अनुपमा जोशी यांच्या पुढाकारातून सलग 13 व्या वषी फेम फिएस्टा सोहळा पार पडला. स्पर्धा, कलाविष्कार सादर करण्याची संधी, महिलांच्या उद्योगशीलतेला प्रेरणा, महिलांच्या कार्याचा गौरव आणि सोबत खरेदीची संधी असा परिपूर्ण उपक्रमांचा सोहळा महिलांना अधिकच भावला.

फेम फिएस्टा हा सोहळा रविवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे पार पडला. सोहळयाचे उद्घाटन सायंकाळी डॉ. अनुपमा जोशी, प्रा. अरुणा नाईक    सत्कारमूर्ती महिलांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱया कर्तृत्ववान महिलांचा गौरव समारंभ पार पडला.  किचन क्वीन प्राजक्ता शहापूरकर, अंकुरच्या संचालिका गायत्री गावडे, कार रेसर ईशा शर्मा, नृत्य प्रशिक्षिका धनश्री गुरव, सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी यांचा शाल, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन डॉ. अनुपमा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. 100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून चित्रकला स्पर्धा रंगीत बनली. आईच्या जोडीने सोहळयात सहभागी झालेल्या मुलांनी चित्र रंगवत फिएस्टाचा आनंद लुटला. सदर स्पर्धेतील अनुक्रमे पहिल्या गटात स्वरांजली कारेकर, प्रतिक्षा पाटील, रिद्दी गायकवाड तर दुसऱया गटात दिशा भोजे, सानिका नाईक, निलांबिका पाटील व तिसऱया गटात दिप्ती सप्लीगा, प्रतिक पाटील, जे. गोडसे यांनी क्रमांक मिळविले.  यानंतर महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. तिखट गोड पदार्थांतून पाककला सादर केली. गोड पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत प्रिती रायकर, निकिता गोडवानी, रेणू एस.एस. यांनी तर तिखट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत धनश्री  हलगेकर, रुपांजली भोसले, ऐश्वर्या कम्मार यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले.

 सायंकाळच्या सत्रात महिलांच्या नृत्य कलेचा आविष्कार सादर झाला. एक प्रॉप वापरुन आपल्या नावीन्य आणि सृजनशीलतेतून नृत्य सादर केले. यामध्ये नुपुर गुप प्रथम, नाविन्या रॉक्स द्वितीय तर क्वीन्स ग्रुप व गोवन शुगर यांनी अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून धनश्री गुरव, रवी सेठ पाककला स्पर्धा मनिषा कक्केरी, मेघना हेगडे तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून  शिल्पा मनोज  यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षकांचा गौरव करण्यात आला.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा नाईक यांनी केले.

परिपूर्ण पॅकेज

फेम फिएस्टा म्हणजे महिला वर्गासाठी खरेदीचे परिपूर्ण पॅकेज ठरले. महिलांनी महिलांकडून महिलांसाठीच आयोजित उत्सवात कलाविष्कार सादर करण्याबरोबरच आपल्या उद्योगशीलतेला वाव मिळण्याची संधी लाभली. महिलांच्या उद्योग व्यवसायाचे सादरीकरण या उत्सवातून अनुभवायला मिळाले. 120 हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून महिलांनी आपली उत्पादने सादर केली. यामुळे महिलांना एकाच व्यासपीठावर ज्युवेलरी पासून गृहकामापर्यंतच्या वस्तुंची खरेदी करता आली.  स्वतःपासून ते कुटुंबापर्यंतच्या जबाबदाऱया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. खाद्यपदार्थांचे स्टॉल खाद्यप्रेमी मंडळींसाठी नानाविध पदार्थांची चव चाखण्यासाठी सज्ज होते. महिलांकडून महिलांसमोर महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या उद्योगशीलतेला वाव देण्याचा हा उत्सव महिलांच्या उपस्थितीने अधिकच बहरला.

Related Stories

सण येता गोडव्याचा

Patil_p

नव्या युगातील आपण

Patil_p

गौरव कुस्ती परंपरेचा

Patil_p

‘बच्चे कंपनी’ रमली स्वयंपाकघरात

Omkar B

साहित्यिक सावित्री

Patil_p

आगळी शिक्षणसेवा

Patil_p
error: Content is protected !!