Tarun Bharat

फेसबुककडून कारवाई : वर्णद्वेष पसरवणारी 200 अकाउंट बंद

ऑनलाईन टीम / सॅन फॅन्सिस्को : 


गौरवर्णीयांना सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या द्वेषमूलक गटांशी संबंधित असणारी 200 अकाउंट फेसबुकने बंद केली आहेत. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या वर्णद्वेषी दंगलीमध्ये शस्त्रांसह सहभागी होण्यासाठी हे गट लोकांना उद्युक्त करीत होते. 
मिळाल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर हे गट प्राऊड बॉईज आणि अमेरिकन गाडी या नावाने कार्यरत होते. या गटांच्या माध्यमातून ते द्वेष पसरवत होते. 


या बाबत फेसबुकच्या दहशतवादी विरोधी आणि धोकादायक संघटना धोरणाचे संचालक ब्रायन फिशमॅन यांनी सांगितले की, हे दोन्ही गट आपल्या समर्थकांना आणि सदस्यांना निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र करण्याची योजना आखत होते. तसेच काही प्रकरणांमध्ये शस्त्रास्त्रांसह सहभागी होण्याची तयारी करत होते. 

ते पुढे म्हणाले, या गटांवर आमची पहिल्या पासूनच नजर होती. मिनीयापोलिस प्रघात जॉर्ज फ्लाॅइड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिस अधिकाऱ्याकडून हत्या झाल्यानंतर उसळला दंगलीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न हे दोन गट करीत होते. 


मात्र, या गटांची काय योजना होती. अमेरिकेत कोणत्या भागात राहत होते याबाबतची माहिती मात्र कंपनीने जाहीर केली नाही आहे. आतापर्यंत जवळपास 200 अकाउंट फेसबुक वरून बंद करण्यात आली आहेत. तसेच अशाप्रकारे द्वेष पसरवणारे अकाउंट, पेजेस, गटांना फेसबुक वरून काढून टाकण्याची कृती यापुढेही सुरूच राहणार असल्याचे फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

हंता विषाणूने वाढवली चिंता

datta jadhav

ईस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात सीरियात 5 सैनिक ठार

Patil_p

रोगप्रतिकारक पेशींचे संवर्धन आता सुलभ

Patil_p

रशियाच्या धमकीनंतर पोलंडचा युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविण्यास नकार

datta jadhav

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Archana Banage

महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी शरद पवार आखाड्यात !

Abhijeet Khandekar