Tarun Bharat

फेसबुकवरील फोटो महिलांची बदनामी करणारा गजाआड

वाई पोलिस गुन्हे प्रकटीकरण पथकाची पुणे येथे कारवाई

प्रतिनिधी / वाई

फेसबुकवरील महिला व मुलींचे फोटोंमध्ये फेरफार करून अश्लिल फोटो फेसबूक व समाज माध्यमांवर सोडून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी

एकास अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जानेवारी 2020 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. 

वाई गुन्हे प्रकटीकरणच्या शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे सिंहगड रोड, पुणे येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून आरोपीला गजाआड केले. प्रविण रेमजे असे संशयितांचे नाव आहे. त्यास वाई न्यायालयाने कोठडी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

जानेवारी 2020 दरम्यान एका मुलीस बनावट फेसबुक खात्यावरून संशयिताने फेसबुक मेसेंजर ओळख काढली. यावेळी त्याने मुलीचा व्हॉटसऍप मोबाईल नंबर घेतला. यानंतर तिच्या फेसबुकवरील फोटोचा गैरवापर करुन अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो मुलीला पाठविले, तसेच बनावट फेसवबुक खात्यावर पाठविले. याबाबत पीडित मुलीच्या दाखल तक्रारीवरून दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी अज्ञात आरोपीचा तांत्रिक पध्दतीने व बातमीदारामार्फत तपास केला. आरोपीने बीड येथील दुस्रयाच्या नावावर असलेले सिमकार्डचा वापर करुन बनावट फेसबुक खाते उघडून वाशी, रत्नागीरी, वाई येथील मुली व महिलांची अशाच पद्धतीने बदनामी होईल असे कृत्य केल्याचे व त्याच्यावर सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.पुणे येथे हॉटेलमध्ये वेटरकाम करताना सहकायाचे सिमकार्ड चोरून संशयिताने हे गैर कृत्यु केले. संशयीताचे सर्व मोबाईल बंद लागत होते व त्याच्या सध्याच्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त होत नव्हती.त्यामुळे आरोपी मिळून येत नव्हता.तपास अधिकारी आनंदराव खोबरे यांनी तांत्रिक माहिती मिळवत कसोशीने तपास केला.त्याला पुणे येथून ताब्यात घेतले.न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील,उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पो.ना.प्रशांत शिंदे, पो.कॉ. सोमनाथ वल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी केली.

Related Stories

खटाव तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आल्याची लागवड

Patil_p

वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

Patil_p

पाटणमध्ये गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे सहित एकास अटक

Patil_p

उदयनराजे-रामराजेंच्यात तह..!

Patil_p

आराधना गुरव यांना साहित्यरत्न पुरस्कार

Patil_p

फुकटचे श्रेय घ्याल तर जागा दाखवून देवू

Amit Kulkarni