प्रतिनिधी / बेळगाव :
फेसबुक प्रेंन्डस् सर्कलतर्फे बिम्स हॉस्पिटलला एक लोखंडी खाट, 55 ब्लॅंकेटस्, बिस्कीटाचे दोन जंबो बॉक्स देण्यात आले. बिम्स्मध्ये सध्या कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या मदतीसाठी म्हणून ही मदत देण्यात आले. बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी ही देणगी स्वीकारली व सर्कलचे आभार मानले. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डचे सदस्य साजीद शेख, फेसबुक प्रेन्डसचे संतोष दरेकर उपस्थित होते.
या मदतीसाठी फेसबुक प्रेन्डस् सर्कलला अनेक दात्यांची मदत झाली आहे. सर्कलतर्फे सातत्याने रक्तदानही केले जाते. कोरोना योध्यातील अनेकांना सर्कलने मदत केली आहे.