Tarun Bharat

फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ

नवी दिल्ली

ऍपलची भारतीय सहकारी कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आपला आयपीओ सादर करण्यासाठी विचार करते आहे. या आयपीओच्या माध्यमातून 5000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. हॉन हाय प्रिसिजन इंडस्ट्री ही तैवानी कंत्राट निर्मिती कंपनी भारतात 2019 पासून कार्यरत आहे. कंपनीला आपला विस्तार करायचा आहे. भारतामध्ये स्मार्टफोन्सची निर्मिती करणाऱया फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील तीन वर्षांमध्ये केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. दक्षिण भारतात कंपनी ऍपल आयफोन असेम्बलडचे (जोडणी) काम करते. ऍपलचे आयफोन मॉडेल फॉक्सकॉन चीनमध्ये तयार करते. आता हे उत्पादन तामिळनाडू व आंध्रातील उत्पादन कारखान्यात होणार आहे.

Related Stories

धनत्रयोदशीला 40 टन सोने विक्री

Patil_p

इमामीचे 25 हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट

Patil_p

ऍपलची 22 जूनपासून वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

रिलायन्स-एचडीएफसीच्या कामगिरीने सेन्सेक्स तेजीत

Patil_p

सॅमसंगचा विंड फ्री एसी बाजारात

Patil_p