Tarun Bharat

फॉगनिनीही कोरोनाबाधित

वृत्तसंस्था/ मिलान

इटलीचा अग्रमानांकित टेनिसपटू फॅबिओ फॉगनिनीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर सार्दिनिया ओपन टेनिस स्पर्धेतून बुधवारी त्याला माघार घ्यावी लागली आहे.

कोव्हिड 19 चाचणीत आपण पॉझिटिव्ह आलो असल्याचे 33 वर्षीय फॉगनिनीने सकाळी सर्वांना सांगितले. ‘लक्षणे अगदी सौम्य प्रमाणात असून थोडा खोकला, ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे. पण दुर्दैवाने ही वाईट बातमी आली आहे. मी त्याआधीपासूनच आयसोलशनमध्ये असून मी यातून लकवर बरा होणार असल्याची मला खात्री वाटते,’ असे त्याने सांगितले. त्याला येथील स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती आणि दुसऱया फेरीचा सामना स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बाएनाशी होणार होता. त्याच्या जागी आता क्रोएशियाच्या डॅनिलो पेट्रोविकला स्थान देण्यात आले आहे.

मंगळवारी फॉगनिनी व त्याचा साथीदार लॉरेन्झो मुसेटी यांना त्यांच्याच देशाच्या लॉरेन्झो सोनेगो व आंदेया वावासोरी यांच्याकडून उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. दोन तास झालेल्या त्या लढतीतील तिसऱया सेटमधील टायब्रेक 15-13 अशा गेम्सपर्यंत रंगला होता. गेल्या वर्षी फॉगनिनीने माँटे कार्लो स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर दोन्ही पायांच्या घोटय़ावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर यावर्षी तो सहा महिने टेनिसपासून दूर राहिला होता.

Related Stories

अफगाणचा आयर्लंडवर 27 धावांनी विजय

Patil_p

विद्याराणी देवीला रौप्य

Patil_p

बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरला ‘सुवर्ण’

datta jadhav

आयपीएलचा समारोप कार्यक्रम होणार

Patil_p

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात

Patil_p

अझारेन्का, सॅम क्वेरीला पराभवाचा धक्का

Omkar B