Tarun Bharat

फोंडाघाट हायस्कूलच्या प्रसाद पारकर यांना उत्कृष्ट गणित अध्यापक पुरस्कार

Advertisements

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील गणित विषयाचे शिक्षक प्रसाद कृष्णा पारकर यांनी सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट गणित अध्यापक मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पारकर यांनी सलग तीन वर्ष हा पुरस्कार मिळवत ह्याट्रिक साधली आहे.

वसुंधरा विज्ञान केंद्र कुडाळ नेरूरपार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गणित शिक्षकांच्या ४१ व्या राज्य अधिवेशनामध्ये त्यांना कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गणित मंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव, उपाध्यक्ष औदुंबर भागवत, कार्यवाह बाजी पाटील तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष वामन खोत, कार्यवाह तुकाराम पेडणेकर तसेच गणित मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते

कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०१७ ते मार्च २०१९ या एस.एस.सी. परीक्षांमध्ये पारकर यांच्या तब्बल १६ विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्रीकांत आपटे, सेक्रेटरी मनीष गांधी, खजिनदार समीर मांगले, शाळा समीती चेअरमन राजन चिके, व संचालक, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरवृंद विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

जलक्रीडा सुसूत्रतेसाठी मालवण तालुका जलक्रीडा अध्यक्षपदी मनोज खोबरेकर व शहरअध्यक्षपदी राजेंद्र परुळेकर यांची निवड

Ganeshprasad Gogate

कोरोनावर उपचार की कोरोनाला निमंत्रण?

NIKHIL_N

दुसरा डोस कधी घ्यायचा? पहा…

Ganeshprasad Gogate

गोव्यातील तरुणाचे बांद्यात आकस्मिक निधन

NIKHIL_N

तळवणे येथील तरुणाची आत्महत्या

Ganeshprasad Gogate

मालवणच्या जनतेला वेठीस धरू नका!

NIKHIL_N
error: Content is protected !!