Tarun Bharat

फोंडा उपजिल्हा इस्पितळातील डेटा एन्ट्री ऑपरेटर्स संपावर

कंत्राटी कामगार तुटपुंज्या पगारासह हलाखीच्या परिस्थितीत

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा उपजिल्हा (आयडी) इस्पितळात डेटा एन्ट्री ऑपरेटर्स म्हणून कंत्राटीत तत्वावर सेवा बजावणारे कर्मचारी आपल्या विविध मागण्यासह संपावर गेले आहेत. काल सोमवारपासून इस्पितळातील ऑनलाईन नोंदणी सेवा बंद ठेवत सेवेत कायम करा, पगार वाढ, पीएफ व ईएसआय सुविधा लागू आधी लागू कराव्यात अशी मागणी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. 

  प्रात्प माहितीनुसार फोंडा उपजिल्हा ईस्पितळात सरकारतर्फे नेमलेल्या एका बंगळूरस्थित कंपनीचे 9 डेटा एन्ट्री  ऑपरेटर्स मागील काही वर्षापासून इस्पितळात कार्यरत आहेत. इस्पितळातील केज्युअलीटी विभाग, रूग्णाचे पेपर करणे, रक्त चाचणी रिपोर्ट, रूग्णाची इस्पितळात भर्ती याविषयी माहिती संगणकावर नेंदी करण्याची सेवा बजावत आहे. मागील काही वर्षापासून तुटपूंज्या पगारावर कामाला असून वारंवार पगारवाढ व इतर सुविधाची मागणी केल्यानंतरही कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्य निर्वाह निधी, ईएसआय सुविधा नसतानाही  कोरोनाकाळातही या कर्मचाऱयांनी सेवा बजावलेली आहे. सदर कंपनीचे राज्यभर एकूण 33 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी फोंडा उपजिल्हा इस्पितळात 9 कर्मचारी  आहेत. तुटपुज्या पगारावर काम करताना कोरोनाची बाधा झाल्यास कंपनीतर्फे कोणतीच सुरक्षितता पुरविण्यात आलेली नसल्याचा खुलासा त्यानी केला असून  संपावर जाण्य़ाचा ईशारा इस्पितळाचे प्रमुख डॉ. कुवेलकर यांना दिल्याची माहितीही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

   ओपीडीच्या वेळेसंबंधी डॉक्टर अनभिज्ञ – कंत्राटदाराची मनमानी

   यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुवेलकर यांच्यांशी संपर्क साधला असता सदर कर्मचाऱयानी काम बंद ठेवण्यासंबंधी कोणतीही लेखी माहिती दिलेली नसून केवळ तोंडी सांगितले होते. कर्मचाऱयाच्या बेजबाबदार कृतीमुळे इस्पितळाला दिवसाकाठी हजारो रूपयांचा फटका बसणार आहे. सद्यपरिस्थितीत रूग्णांचे हाल होऊ नये यासाठी  ओपीडी विभागात दाखल होणाऱया रूग्णांसाठी आपले कर्मचारी नोंदणीसाठी बसविलेले आहे मात्र त्यांना संगणकाचा पासवर्ड नसल्याने ऑनलाईन नोंदणीही खोळबंलेली आहे.

 ओपीडी विभागात रूग्णांच्या नोंदणीसाठी वेळेचे बंधन ते कर्मचारी पाळत नाहीत. यासंबंधी वेळेच्या बंधनाची नोटीसही सदर कंत्राटदारांने लावण्यात आल्याची माहिती डॉ. कुवेलकर यांनी दिली असून सदर वेळेच्या बंधनाच्या नोटीसीपासून आपण अनभिज्ञ असल्याचे ते म्हणाले. सदर कर्मचाऱयांनी डॉक्टर ओपीडी विभागात असेपर्यत सेवा देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

  सदर कंपनी व कर्मचाऱयांनी सहमत करून तोडगा काढावा, यातून कोणताच निष्कर्ष निघत नसल्यास इस्पितळासाठी संगणकतज्ञ कर्मचाऱयाची नेमणूक व्हावी असे डॉ. कुवेलकर म्हणाले.

Related Stories

गुरु कल्याणाचा मार्ग दाखवतात

Amit Kulkarni

चक्रीवादळामुळे सत्तरीत सुमारे दहा लाखांचे नुकसान

Omkar B

जॉन आगियार यांच्या नवदुर्गेवरील गीताचे अनावरण

Amit Kulkarni

‘कारखानीसांची वारी’ मध्यमवर्गीय कुटुंबातील गुंतागुंतीचे आयुष्य आणि नातेसंबंधांवर तिरकस भाष्य करणारा चित्रपट

Archana Banage

नवेवाडे वास्कोत अज्ञाताकडून दुचाक्यांना आग, पूर्ववैमनस्याचा संशय

Patil_p

म्युरल चित्रकार प्रसाद नाईक यांची आज दूरदर्शनवर मुलाखत

Amit Kulkarni