Tarun Bharat

फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे 15 रोजी महालसेला नमन

19 रोजी फोंडय़ात शिमगोत्सव मिरवणूक

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे येत्या मंगळवार 15 रोजी दुपारी 3 वा. म्हार्दोळ येथील महालसा देवीला नमन घालून पारंपारिक शिगमोत्सवाला प्रारंभ होणार  असल्याची माहिती फोंडा येथे घेतलेल्या खास बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार रवी नाईक यांनी दिली. त्यानंतर सरकारी पातळीवरील राज्यस्तरिय शिमगोत्सव मिरवणूक फोंडयातून 19 मार्च रोजी  होणार आहे.

राजीव कला मंदिर फोंडा येथे घेतलेल्या खास बैठकीत शिमगोप्रेमीससह प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, नगरसेवक विश्वनाथ दळवी, रितेश नाईक, आनंद नाईक, अंत्रुज शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी अशोक नाईक, सचिव किशोर नाईक उपस्थित होते. शिगमोत्सवाला यंदा चित्ररथ मिरवणूकीचा सहभाग अल्प प्रमाणात येणार असल्यामुळे फक्त रोमटामेळ, वेशभूषा, लोकनृत्य स्पर्धावर जास्त भर दिला जाणार आहे. शिगमोत्सव समितीच्या नेमणूकीसाठी वेळ कमी असल्याने नवीन समिती न निवडता जुन्या समितीला जोडूनच नवीन सदस्याची नोंदणी करण्यात येणार आहे. येत्या 18 मार्च रोजी शिमगोत्सवाच्या स्पर्धासाठी परीक्षक तसेच निर्णायक रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. शिमगोत्सवाची परंपरा युवकांनी खाद्यावर घेत पुढे नेणे गरजेची आहे. कोविडच्या परिस्थितीतून सावरताना यंदा चित्ररथ स्पर्धेबाबत साशंकता आहे. केवळ रोमटामेळ स्पर्धा, लोकनृत्यावरच शिमगोत्सवाची मदार राहणार आहे. अंत्रुज शिगमोत्सवातून पारंपारिक लोकसंस्कृती एका पिढीतून नव्या पिढीपर्यंत पोचणे हेच  उद्दिष्ट असल्याचे आमदार गोविंद गावडे म्हणाले.

फोंडय़ातील शिमगोत्सवाची परंपरा ही सन 1980 पासून फोंडा पालीकेच्या कर्मचाऱयातर्फे सुरूवात झाली होती. फोंडा तालुक्यातील सर्व नागरिकाना या समितीत सामावून घेतले जाईल. आचारसंहितेमुळे यंदा फोंडय़ात कार्निव्हाल मिरवणूकही स्वखर्चाने काढण्यात आली होती. त्याचधर्तीवर शिमगोत्सव मिरवणूकही काढण्यात येणार असल्याची माहिती रवी नाईक यांनी दिली.

स्वागत व प्रास्ताविक अशोक नाईक यांनी केले. सुत्रसंचालन गुरूनाथ उर्फ भाई नाईक यांनी केली. विश्वनाथ दळवी यांनी आभार मानले. यावेळी फोंडय़ातील शिमगोप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

खांडोळय़ात धोंडगणांनी पाळले घरीच व्रत

Omkar B

पीर्ण शांतादुर्गा विद्यालयात विद्यार्थी मंडळ स्थापन

Amit Kulkarni

भटवाडी कोरगाव येथे सापडला रशियन नागरिकाचा मृतदेह

Amit Kulkarni

बेरोजगारांच्या भावनांशी सरकारचा खेळ

Patil_p

कृषीसाठी गोव्याने इस्रायलची मदत घ्यावी

Patil_p

सुकूर वेताळ देवस्थानच्या अध्यक्षपदी नारायण हिरोजी

Amit Kulkarni