Tarun Bharat

फोंडा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षावरील ठराव संमत

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 9 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. शुक्रवारी सकाळी ठरावावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासह 6 नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने उर्वरित सर्व नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले.

नगरसेवक विश्वनाथ दळवी, रितेश नाईक, आनंद नाईक, यतीश सावकार, विरेंद्र ढवळीकर, विलीयम आगियार, चंद्रकला नाईक व अर्चना डांगी या आठजणांनी ठरावावर स्वाक्षरी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी या आठ नगरसेवकां व्यतिरिक्त व्यंकटेश नाईक यांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने 9 विरुद्ध शून्य मतांनी ठराव संमत झाला. नगराध्यक्ष गीताली तळावलीकर, उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्यासह नगरसेवक शांताराम कोलवेकर, प्रदीप नाईक, सीमा फर्नांडिस व अमिना नाईक हे सहाजण अनुपस्थित राहिले.

निर्वाचन अधिकारी म्हणून केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी साहाय्य केले. पुढील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसंबंधी विचारले असता फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी म्हणाले, सर्व नऊही नगरसेवक एकत्र येऊन हा निर्णय घेतील. मात्र पुढील नगराध्यक्ष म्हणून रितेश रवी नाईक यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. उपनगराध्यक्षपद ठरावाला पाठिंबा दिलेल्या दोघां नगरसेविकांपैकी एकाला मिळण्याची शक्यता वर्तविली जाते. 

Related Stories

सत्तेच्या स्वार्थासाठीच ‘मगो’कडून ‘आप’चे गुणगान

Amit Kulkarni

मंत्री खंवटे, मोन्सेरात यांच्या भूमिकांमुळे चर्चेला जोर

Patil_p

मोरजीत बेकायदा बांधकामांना ऊत

Amit Kulkarni

आमदार प्रेमेंद्र शेट यांची बेळगाव एपीएमसीला भेट

Amit Kulkarni

पणजीसह पर्वरी, ओल्ड गोव्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे धूळखात

Amit Kulkarni

आगीमुळे वन्यप्राण्यांच्या हिरवळ खद्यावर परिणाम

Amit Kulkarni